जालना : राज्यसरकारने (State Governement) शनिवारी (8 जानेवारी) लागू केलेल्या निर्बंधांमध्ये आंशिक बदल केले आहेत. त्यानुसार जिम (Gym) आणि ब्युटीपार्लर (Beauty parlor) 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास राज्यसरकारने सशर्त परवानगी दिली आहे. याबाबत शासनाकडून नवीन आदेश जारी करण्यात आले आहेत. काल लागू केलेल्या निर्बंधांमध्ये जिम, सलून, स्पा, ब्युटी पार्लर 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र या संघटनांनी विरोध केल्यानंतर राज्य सरकारने या निर्बंधात काही प्रमाणात सूट दिली आहे.(Gym Beuty Parlor and Salon Latest Guidelines in Maharashtra)
राज्यातील कोरोनाच्या (Corona Virus) तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून दिवसेंदिवसं रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. आज रात्रीपासून (ता. 9) हे नियम लागू केले जाणार आहेत. रात्री 10 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सलून 50% क्षमतेने रात्री 10 पर्यंत चालू ठेवता येणार आहेत. जलतरण तलाव, व्यायामशाळा, ब्यूटी पार्लर, पर्यटन केंद्र , किल्ले, म्युजियम बंद करण्यात येणार आहे. शॉपिंग मॉल्स, मार्केट मध्ये 50% क्षमतेने उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. (Maharashtra Govt Allows Opening of Gyms, Salons With 50% Capacity)
मॅाल्समध्ये दोन डोस घेतलेल्यांनाच परवानगी असणार आहे. रात्री दहा नंतर ते बंद असणार आहेत. शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहेत. हॉटेल 50% क्षमतेने सुरू राहणार आहेत. मात्र, रात्री दहा वाजता ते बंद करावे लागणार आहे. नाट्यगृज सिनेमगृह 50% क्षमतेने सुरु राहणार आहेत. कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद असणार आहेत. तसेच खासगी कार्यालये 50 टक्के शमतेने सुरु ठेवता येणार आहेत.
सुधारित आदेशानुसार...
- ब्युटी पार्लर आणि हेअर कटिंग सलून यांचा एकाच गटात असतील. हेअर कटींग सलूनमध्ये वरीलप्रमाणे नमूद केलेल्या निर्बंधांच्या अधीन राहून 50% क्षमतेसह उघडे राहतील. या आस्थापनांमध्ये फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्या कामांसाठी मास्क काढण्याची गरज भासणार नाही. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. तसेच, या आस्थापणांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचेही पूर्णपणे लसीकरण केलेले असावे.
- कोणतेही काम करताना मास्क वापरण्याच्या अधीन राहून 50% क्षमतेसह जिम सुरू ठेवण्यास परवानगी आहे. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी दिली जाईल. आस्थापनांमध्ये काम करणारे सर्व कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे लसीकरण केलेले असावे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.