Ulhasnagar Crime News update : माजी आमदार पप्पू कलानी आणि ज्योती कलानी यांचे स्वीय सहायक नंदकुमार ननावरे यांनी काही दिवसांपूर्वी पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. ननावरे दाम्पत्यांनी आपल्या आत्महत्येमागे दोन मंत्र्यांचीही नावे घेतली होती. पण त्यांच्यावर राज्य सरकारने अद्याप कोणतीही कारवाई न केल्यामुळे ननावरे यांच्या भावाने आज उद्विग्न होऊन राज्य सरकारलाआपले बोट कापून पाठवत असल्याचे सांगितले. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
ननावरे दाम्पत्याच्या आत्महत्येमागे शिंदे सरकारच्या दोन मंत्र्यांचा समावेश आहे. ननावरे दाम्पत्याला आत्महत्येला प्रवृत्त करण्यामागे दोन मंत्री आहेत. एक मुंबईचा आणि दुसरा फलटणचा. त्या उद्वेगाने ननावरेंच्या भावाने आपले बोट कापून गृहमंत्र्यांना पाठवलं आहे. हे इतंक विदारक चित्र आहे. पण गृहमंत्र्यांपर्यंत त्या वेदना पोहोचत नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आता काही लोकांना अटक केली, ते समजू शकतो. पण या आत्महत्येमागचे जे मुख्य आरोपी आहेत ते मंत्रिमंडळात मंत्री आहेत.असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मग आता कुठे गेले लहानसहान गोष्टींवरून आमच्यावर आरोप करणारे, हे नक्की काय प्रकरण आहे त्याचं सत्य समोर आलं पाहिजे. मृतांच्या कुटुंबीयांपैकी एक जण हाताचे बोट कापून पाठवत असेल, जर गृहमंत्र्यांना माणूसकी असती तर त्या भावाला समोर बसवून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चर्चा केली असती. या राज्यात अमानुष पद्धतीने कारभार सुरू आहे. त्याचं हे विदारक चित्र असल्याची टीकाही राऊतांनी केली आहे.
दरम्यान, ननावरे दाम्पत्याने आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील काही व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आरोप त्यांनी व्हिडीओत केला होता. तसेच ननावरे यांनी तो व्हिडीओ पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी व त्यांच्या निवडक सहकाऱ्यांनाही पाठवला होता. तसेच, पोलिसांनी नंदकुमार ननावरे यांच्या मृतदेहाची तपासणी करताना त्यांच्या खिशात एक चिठ्ठीही मिळाली होती.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.