Old Pension Scheme : कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; राज्य सरकारने काय दिली आश्वासने?

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama

Old Pension Scheme News : गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेला शासकीय कर्मचाऱ्यांचा (state Government) संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला. त्यामुळे संप मागे घेत असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांचे समन्वयक विश्वास काटकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना आश्वासने देण्यात आली. बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती, काटकर यांनी दिली. ते म्हणाले, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन (Old Pension Scheme) योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर राज्य सरकारने स्वीकार केल्याचे आश्वासन दिले.

Eknath Shinde News
Shivajirao Adhalrao Patil : पराभवानंतरचा उद्धव ठाकरेंचा अनुभव खुपच क्लेषदायक; आढळरावांनी स्पष्टच सांगितले

या वेळी काटकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांबरोबर आज सविस्तर चर्चा झाली आहे. आजची चर्चा यशस्वी झाली आहे. आमची मूळ मागणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करा, अशी होती. शासनाने यासंदर्भात गेल्या सात दिवसांत वेगवेगळी पावले उचलली. आज सरकारकडून आम्हाला सांगण्यात आले की याबाबत ते गंभीर विचार करत आहेत.

यासंदर्भात सरकारने समिती नेमली. ही समिती आधी आम्ही नाकारली होती. मात्र, आज सरकारने एक नवा प्रस्ताव सादर केला आहे. त्यानुसार तत्वत: जुन्या पेन्शन योजनेची कर्मचाऱ्यांची मागणी स्वीकारण्यात आली. जुनी आणि नवी पेन्शन योजनेमध्ये मोठे अंतर आहे. यापुढे सर्वांना समान निवृत्तीवेतन मिळेल. त्यात अंतर राहणार नाही, अशी भूमिका राज्य सरकराने आम्हाला लेखी स्वरूपात कळवली आहे. जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात सुरू होईल. ती निकोप होण्यासाठी समिती त्याबाबत विचार करेल, असे काटकर यांनी यावेळी सांगितले.

७ दिवस आम्ही संपावर होतो. संपकालावधी आमच्या खात्यावरच्या उपलब्ध रजा मंजूर करून नियमित करण्यात येईल. ज्यांना कारवाईसंदर्भात नोटीस गेल्या आहेत, त्या राज्य सरकार मागे घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात आली. शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांना समजून घेतले. शासन यावर गतीने कार्यवाही करेल, असा विश्वास आम्हाला वाटतो, असेही काटकर म्हणाले.

Eknath Shinde News
Old Pension Scheme : मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक यशस्वी; सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

उद्यापासून महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे, असे काटकर यांनी यावेळी सांगितले. विशेषत: ज्या ठिकाणी गारपीट झाली आहे, जे शेतकरी अडचणीत आहेत त्या ठिकाणी तातडीने मदत मिळेल यासंदर्भात विशेष काम करावे. रुग्णालयात तुमच्या गैरहजेरीमुळे जी अडचण झाली असेल, त्यावर तातडीने काम करावे, अशा सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या, असल्याचे काटकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com