वानखेडे आल्यापासून एनसीबीतील चार अधिकारी निलंबित!

पत्रामध्ये वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Sameer Wankhede with Senior Officer.
Sameer Wankhede with Senior Officer.File Photo

मुंबई : समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे एनसीबीचे विभागीय संचालक झाल्यापासून चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांना (Nawab Malik) आलेल्या निनावी पत्रात करण्यात आला आहे. मी एनसीबीत (NCB )असल्यानं माझं नाव उघड करू शकत नाही. माझे नुकसान केले जाऊ शकतं, असंही या पत्रात म्हटलं आहे. समीर वानखेडे यांची चौकशी करण्याची मागणीही संबंधित अधिकाऱ्याने या पत्रात केली आहे.

पत्रामध्ये वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वानखेडे यांनी एनसीबी मुंबीचा कार्यभार सांभळल्यापासून जेवढी प्रकरणे दाखल केली आहेत, त्यात पकडलेल्या व्यक्तींच्या जवळपास 25 कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या जातात आणि आपल्या मर्जीप्रमाणे पंचनामे बदलले जातात. सह्या असलेले कोरे कागद एनसीबीचे सर्व अधिकारी (IO) तसेच अधिक्षक विश्व विजय सिंह यांच्या कार्यालयातही सापडतील, असं पत्रात म्हटलं आहे.

Sameer Wankhede with Senior Officer.
एनसीबी अधिकाऱ्याचं पत्र उघड; शहांना सांगून राकेश अस्थानांनी वानखेडेंना एनसीबीत आणलं!

समीर वानखेडे यांच्या चुकीच्या कामांवर उपमहासंचालक अशोक मुथा जैन पांघरून घालतात. तसेच इतर अधिकाऱ्यांनी वानखेडेंविषयी तक्रार केल्यास त्यांना वाचवतात. वानखेडे यांची साथ न देणाऱ्यांना ते कोणत्या ना कोणत्याप्रकारे निलंबित करतात. आतापर्यंत वानखेडे यांनी अशा चार प्रामाणिक अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, असे आरोप पत्रात करण्यात आले आहेत.

दरम्यान, मलिकांनी हे पत्र एनसीबीच्या अधिकाऱ्यानं दोन दिवसांपूर्वीच पाठवल्याचा दावा केला आहे. त्यांच्यासह हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक दिलीप वळसे पाटील, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनाही पाठवण्यात आलं आहे. मलिक यांनी हे पत्र आज ट्विटरवर टाकलं आहे. या पत्रामध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आलं आहे. यामध्ये एनसीबीने आर्यन खानसह गुन्हे नोंदवलेल्या इतर 26 प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Sameer Wankhede with Senior Officer.
वानखेडे अन् एनसीबीला विशेष न्यायालयाकडून झटका

नवाब मलिक यांनी या पत्राच्या अनुषंगाने चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली आहे. या पत्रातील सत्यतेबाबत एनसीबीकडून चौकशी झाल्यास सत्य समोर येईल. कोणताही कार्यरत अधिकारी आपल्याच कार्यालयातील माहिती उघड करताना नाव जाहीर करत नाही. त्यामुळे या पत्रावर विश्वास ठेवावा लागेल, असंही मलिक म्हणाले. एनसीबीला वानखेडे यांची चौकशी करताना या पत्राची मदत होईल. एनसीबी महासंचालकांना हे पत्र दिले जाईल, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com