राज ठाकरेंनी लिहिलेलं पत्र म्हणजे मॅच फिक्स होती...

Shivsena : नुसता पराभव नाही तर डिपॉझिट सुद्धा जप्त होणार म्हणून...
Priyanka chaturvedi Latest News
Priyanka chaturvedi Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पोटनिवडणुकीच्या निमित्ताने अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या (Shivsena) उमेदवार ऋतुजा लटके यांना उमेदवारीच मिळू नये यासाठी निर्माण करण्यात आलेले अडथळे, त्यावर उच्च न्यायालयाने महापालिकेचे काढलेले वाभाडे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्रानंतर (Bjp) भाजपने घेतलेली माघार यामुळे अंधेरी पुर्वची पोटनिवडणूक चांगलीच गाजली आहे. (Priyanka chaturvedi Latest News)

दरम्यान, या निवडणुकीत भाजपने माघार घेतल्याने ऋतुजा लटके यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावर भाजप आणि शिंदे गटाकडून एखादा नेत्याचं निधन झाल्यावर त्या जागेवर निवडणुका न घेता त्यांच्या घरातील सदस्याला बिनविरोध निवडून दिले जाते,अशी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, असे सांगण्यात येत आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पराभवाच्या भीतीने आणि उमेदवारी अर्ज भरून मागे घेतल्याची टीका करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार यांनीही यावर टीका केली असून भाजपने पराभवाच्या भीतीने या निवडणुकीतून माघार घेतली असून राज ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून केलेलं आवाहन म्हणजे मॅच फिक्स होती, अशी टीका त्यांनी भाजप आणि राज ठाकरेंवर केली आहे.

Priyanka chaturvedi Latest News
`राज ठाकरेंनी अंधेरीची निवडणूक एकहाती जिंकली`

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, भाजप- शिंदे गटाला माहीत होत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव होणार होता. नुसता पराभव नाही तर डिपॉझिट सुद्धा जप्त होणार म्हणून त्यांनी माघार घेतली आहे. राज ठाकरे यांनी लिहिलेली पत्र म्हणजे मॅच फिक्स होती. भाजपने संवेदनशीलतेवर आता बोलू नये, कारण त्यांनी ऋतुजा लटके त्यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आणि आता संवेदनशीलता दाखवत आहे. राज ठाकरे यांनी पाठवलेलं पत्र हे सर्व फिक्स होतं. येणाऱ्या महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांना जनता धडा शिकवल्या शिवाय राहणार, अशी प्रतिक्रिया प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे.

Priyanka chaturvedi Latest News
Andheri by elaction : कुत्र्यांचा व्हिडिओ शेअर करीत सावंतांचा भाजपवर हल्लाबोल...

दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे. तर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून यावर राज्याची सांस्कृती पाळली असल्याची सावरासावर करण्यात येत आहे. शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली असून हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला लढायला शिकवलं रडायला नाही. समोरचा शत्रू कितीही बलाढ्य असू दे. शेवटी पराभव समोर दिसताच मागार घेतली,असो शेवटी काय धकधकत्या "मशाली" समोर मिंधेगट, महाशक्तीची माघार. ये डर जरूरी है! असा टोला दानवेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com