मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ला झाल्याची घटना काल (मंगळवारी) घडली आहे. त्यांच्या चिपळूणमधील घरासमोर दगड,क्रिकेटचे स्टम्प आणि काचेच्या बाटल्या सापडल्यामुळे स्थानिक परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेच्या विरोधात आज (बुधवारी) ठाकरे गटाकडून नवी मुंबईत आंदोलन करण्यात आले. (bhaskar jadhav latest news)
या प्रकारामुळे आता राजकीय वातावरणही तापताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत.
जाधव यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. भास्कर जाधव यांच्या घरावरील हल्ल्यामागे यंत्रणा आहे का ? त्याला राजकीय पाठबळ मिळाले का याबाबत तपास करावा, असे आदित्य ठाकरे म्हणाले.सरकार घटनाबाह्य असून यंत्रणेचा दुरुपयोग केला जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
ठाकरे म्हणाले, “भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला झाला आहे. परंतु माझ्या समोर आणखी एक आलं आहे की, काल रात्री अकरा-साडेअकरा वाजेच्या आसपास तिथली पोलीस सुरक्षा, स्थानिक सुरक्षा काढली गेली आणि बरोबर एक-दोन तासानंतर हा हल्ला झाला आहे. इथे कुठे काही या हल्ल्याला राजकीय पाठबळ आहे का ? कुठंतरी यंत्रणा यामागे आहे का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण हे भ्याड हल्ले आहेत. राजकीय जीवनात आरोप-प्रत्यारोप, टीका, टिप्पणी होत असते पण असे कोणी नसताना घरावर हल्ले, पोलीस संरक्षण काढून घेणं. काल राजन विचारेंची सुरक्षाही कमी केली आहे. हे कुठंतरी यंत्रणेचा गैरफायदा घेणे, दुरुपयोग करणे हे समोर येत आहे.”
"मिरवणुकीत गोळीबार होते, लोकप्रतिनिधींचे कार्यालय तोडले जाते, पण ते तोडणाऱ्या आमदारांवर गद्दारांवर कारवाई होत नाही. या राज्याचे राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर कधीही गेले नव्हते. पण सध्या घटनाबाह्य सरकार असल्यामुळे हे सर्व होत आहे. राज्य सरकारकडून आम्हाला अपेक्षा नाही. ते घोषणा सरकार झाले आहे. रिकामटेकड्या होर्डिंग आणि बॅनरवर खर्च केला जात आहे, पण शेतकऱ्यांना फारशी मदत केली जात नाही," असे आदित्य ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.