Meeting of Opposition Parties : 'इंडिया' आघाडीच्या बैठकीसाठी ठाकरेंची जोरदार तयारी : टीझरही रिलीज

Uddhav Thackeray News : मुंबईत विरोधी आघाडी 'इंडिया'ची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे.
Patna opposition meeting
Patna opposition meetingSarkarnama
Published on
Updated on

'India' Alliance Meet In Mumbai : मुंबईत विरोधी आघाडी 'इंडिया'ची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. या बैठकीमध्ये विरोधी पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार होऊ शकतो, अशी चर्चा आहे. दरम्यान, या बैठकीसाठी ठाकरे गटाच्या वतीने टीझर जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये 'जे देशात हुकूमशाही आणू पाहतात, त्यांच्या विरोधात आम्ही असणार!' असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे. या बैठकीची तयारी महाविकस आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. ठाकरे गटाने जारी केलेल्या टीझरमध्ये पाटण्यातील पहिल्या बैठकीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आदित्य ठाकरे यांच्या सोबत उपस्थित होते, असे दाखवण्यात आले आहे. तसेच गेल्या महिन्यात या आघाडीने बेंगळुरूमध्ये 'इंडिया' असे नाव जाहीर करण्यात आले आहे, तेही दाखवण्यात आले. ठाकरे गटाकडून बैठकीसाठी चोख व्यवस्था केली जात आहे. त्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचीही त्यांना प्रयत्न असल्याचे बोलेल जात आहे.

Patna opposition meeting
Beed politics : पवारांना प्रत्युत्तर नसले तरी 'आम्हीच मोठे' ; हे राष्ट्रवादीने मित्रपक्ष भाजपला दाखवले...

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष भाजपच्या (BJP) विरोधात आपला एकच उमेदवार देणार आहेत. त्याची चर्चा या बैठकीमध्ये होऊ शकते. तसचे या आघाडीत वेगवेगळे पक्ष असल्याने त्यांच्या भूमिका काही मुद्यांवर विरोधी असू शकतात. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जाताना किमान समान कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे. तोही या बैठकीत ठरण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे.

Patna opposition meeting
Madhya Pradesh BJP News: भाजपचे मिशन मध्य प्रदेश : 3 सप्टेंबरपासून 'जन आशीर्वाद यात्रा, अमित शाह दाखवणार हिरवा झेंडा

दरम्यान, या बैठकीमध्ये ११ सदस्यीय समन्वय समितीचीही नियुक्ती केली जाऊ शकते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले होते, 'मुंबईच्या बैठकीत आम्ही ठरवू की ते ११ सदस्य कोण असतील? निमंत्रक कोण असतील ? " या बैठकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी (Rahul Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर नेते दोन दिवसीय बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com