Mumbai News : ज्या शाळेत शिकला, त्याच शाळेच्या मुख्याध्यापकाच्या मुलाला गंडा घातला...; काय आहे प्रकरण?

Mantralay News : मंत्रालयात नोकरीचं आमिष दाखवत अनेकांना गंडा घालणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात
Mantralay
MantralaySarkarnama

Mumbai : मंत्रालयात कंत्राटी लिपिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच शिपाई पदावर नोकरीचं आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पालघर जिल्ह्यातील वाडा येथे राहणाऱ्या एकाला अटक केली आहे. दिपेश भोईर (वय ३३)असं अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दिपेश कडून पोलिसांनी मंत्रालयातील कंत्राटी लिपीक, कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर व कंत्राटी शिपाई या पदाचे एकूण १५ जणांचे नियुक्ती पत्रे जप्त केली आहेत. तसेच त्याच्या स्वतःच्या नावाचे महाराष्ट्र शासन(State Government), सामान्य प्रशासन विभागाचे सह प्रशासन अधिकारी या पदनामाचे ओळखपत्र मिळाले आहेत.

Mantralay
Mumbai News : मोठी बातमी! डॉ.लहानेंसह जे.जेच्या ९ डॉक्टरांचे तडकाफडकी राजीनामे, केले 'हे' गंभीर आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपेश भोईर हा त्याच्या संपर्कात आलेल्या तरुणांना मंत्रालया(Mantralay)त नोकरी लावण्याचं आमिष दाखवून जाळ्यात ओढत असे. मंत्रालयातील कंत्राटी लिपीक, कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर व कंत्राटी शिपाई पदावर नोकरीला लावण्याचं आमिष दाखवत तरुणांना गंडा घालत होता. तरुणांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून रू ५००० ते रू १५,००० उकळत असत. आणि त्यानंतर गायब होत असे.विश्वास संपादन करण्यासाठी तरुणांना बनावट नियुक्ती पत्रे देखील दिली जात असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Mantralay
Kiran Kale : आत्मदहनाचा इशारा देणारे काँग्रेस शहराध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात ; अहमदनगर रस्ते गैरव्यवहार..

दिपेश ज्या शाळेत शिकला. त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा मुलगा भार्गव भालेकर याला मंत्रालयात नोकरी लावून देतो अशी बतावणी केली आणि जो अधिकारी आपलं काम करेल त्याला पार्टी द्यायची असल्याचा बनाव करत त्याने मुलाकडून पैसे उकळले.

तक्रारदार प्रत्यक्ष कामावर हजर होण्यासाठी गेला असता त्याच्याकडील नियुक्ती पत्र व ओळखपत्र बनावट असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर दिपेश विरोधात संबंधितांनी पोलीस(Police) ठाण्यात धाव घेतली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com