Shinde-Fadanvis Politics: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील पाहुणचार कोटींच्या घरात; राज्य सरकारचा मोठा निर्णय...

Expenditure At Varsha - Sagar Bungalow: सत्तांतरानंतर अवघ्या चार महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानात फक्त पाहुणचारावर दोन कोटींहून अधिक खर्च झाल्याची माहिती माहिती अधिकारातून समोर आली होती.
Shinde-Fadanvis Politics :
Shinde-Fadanvis Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Shinde-Fadanvis Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या 'वर्षा' आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या सरकारी निवासस्थानी येणाऱ्या महत्त्वाच्या पाहुण्यांच्या खानपान सेवांसाठी पुरवठादार निश्चित करण्यात आले. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर खानपानासाठी झालेल्या वारेमाप खर्चामुळे विरोधीपक्षांकडून प्रचंड टिका झाली होती. या टीकेनंतर आता राज्य सरकारनेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर होणाऱ्या पाहुणचारावरील खर्चाला कात्री लावण्याचा घेतला आहे.

यानुसार, दोन वेगवेगळ्या खाजगी कंत्राटदारांना वर्षा व सागर बंगल्यावरील खानपानाचे कंत्राट देण्यात आले आहेत. वर्षा निवासस्थानी श्री सुखसागर हॉस्पिटॅलिटी, तर सागर निवासस्थानी खानपान सेवा पुरवण्यासाठी मे. छत्रधारी कॅटरर्सला कंत्राट देण्यात आले आहे. यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थातील खानपानासाठी अंदाजित खर्च अनुक्रमे ३.५० कोटी इतका असेल. तर उपमुख्यमंत्र्यांच्या (Devendra Fadanvis) बंगल्यातील खानपानासाठी १.५० कोटींचा खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच वर्षा बंगल्यासह उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर निवास्थानावरील खर्चही आटोक्यात ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

Shinde-Fadanvis Politics :
Nitin Gadkari Threat Case: गडकरी धमकी प्रकरणात मोठी अपडेट; चौकशीत धक्कादायक खुलासे, केंद्रीय तपास यंत्रणेकडे..

माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी याबाबत माहिती मागवली होती. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी खानपान सेवेसाठी १ जुलै २०२२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ या काळात दोन कोटी ३८ लाख ३४ हजार ९५८ रुपये खर्च झाल्याचे आढळून आले. म्हणजेच दिवसाला सुमारे एक लाख ९३ हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवास्थानावर होत असल्याची माहिती ही माहिती अधिकारातून समोर आली.

आता नव्या करारानुसार कंत्राटदारांसाठी अटी आणि शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. या अटीशर्थींचे उल्लघंन झाल्यास या कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, विविध करारात विविध पदार्थांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. हा करारनामा केल्यानंतर नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्क भरण्याची जबाबदारीदेखील कंत्राटदारांलाच देण्यात आल्याची माहिती आहे.

Edited By : Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com