Jayant Patil Criticized State Govt : सरकारला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही; जयंत पाटलांचा घणाघात

Shinde-NCP Politics : राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या संख्येवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

Mumbai Political News : शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा हा 'कलंक' सरकारला पुसता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या संख्येवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे, असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला आहे.

एका बातमीच्या आधारे, शेतकरी आत्महत्येबाबत जयंत पाटील यांनी भाष्य करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. "एकीकडे सभागृहात बोलताना मुख्यमंत्री राज्याला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा करतात. दुसरीकडे मराठवाड्यात मात्र शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आठ महिन्यांत तब्बल ८६५ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची आकडेवारी धक्कादायक आहे. दिवसाला सरासरी २ ते ३ शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे."

Jayant Patil
Uddhav Thackeray On Bjp : "इंडिया म्हटलं की, काहींना खाज सुटायला लागते..." ; उद्धव ठाकरेंनी काढला चिमटा !

कर्जबाजारीपणा, नापिकी, महागाईमुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती, गेल्या वर्षी अतिवृष्टी, त्यानंतर आता दुष्काळाचे संकट या सगळ्यांतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा हा 'कलंक' सरकारला पुसता येणार नाही, अशी घणाघाती टीका जयंत पाटील यांनी ट्विटमधून केली आहे.

दरम्यान, अवघ्या दहा दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी यवतमाळमधील शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाकडे लक्ष वेधले होते. "यवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिनाभरात तब्बल ३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. खरिपाच्या सुरुवातीला जूनमध्ये पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. नंतर जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. याकडे त्यांनी लक्ष वेधले होते.

Jayant Patil
Munde On Ajit Pawar CM Post : अजित पवार मुख्यमंत्री कधी होणार...? धनंजय मुंडेंनीच वर्षच सांगितले...

तसेच, निसर्गाने अवकृपा केली असताना, शासकीय पातळीवरदेखील सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. त्यात आता दुष्काळाचे भयानक सावट दिसत असल्याने नैराश्य आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा आहे. 'शासन आपल्या दारी'चे मोठमोठे कार्यक्रम करून पैसा दिखाव्याकरिता वाया घालवण्यापेक्षा या पीडित शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या दारी जरूर जावे," अशी मागणीही त्यांनी केली होती.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com