Gunaratna Sadavarte ON Manoj Jarange : जरांगेच्या सभेपेक्षा गावच्या यात्रा मोठ्या; गुणरत्न सदावर्तेंनी डिवचलं!

Gunaratna Sadavarte ON Manoj Jarange : छगन भुजबळ राहिले बाजूला, आता सदावर्ते आणि जरांगे असा सामना पेटण्याची शक्यता...
Gunaratna Sadavarte ON Manoj Jarange
Gunaratna Sadavarte ON Manoj JarangeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gunaratna Sadavarte ON Manoj Jarange : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ आणि मराठा समाजासाठी आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष सुरू असताना आता अॅडव्हाेकेट गुणरत्न सदावर्ते यांनीही जरांगेवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. यामुळे आता छगन भुजबळ राहिले बाजूला, जरांगे आणि सदावर्ते यांच्यातच सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Latest Marathi News)

जरांगे यांची सभा पार पडताच आता सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, "जरांगेच्या त्या सभेला मी यात्रेसारखं पाहतो. गावच्या यात्रासुद्धा याच्यापेक्षा मोठ्या असतात. यात्रेत जसं लोकं मौजमस्ती करायला येतात, त्या प्रकारे जरांगेच्या सभेत काहीच वैचारिक घडलेलं नाही. जरांगेचं बोलणं मग्रुरी, माजोरीपणाचे होते आणि त्यांनी शिवराळ भाषा वापरली. म्हणून त्यांची अकलेची कुवत उघडी पडली आहे. एक मराठा लाख मराठा ही घोषणा जातीची नाही, तर सैनिकांची आहे. जरांगेंचे राजकीय बॉसेस वेगळे आहेत," असे अनेक आरोप सदावर्ते यांनी केले.

जरांगेंच्या अटकेची मागणी केली होती -

जरांगेंच्या ऐन सभेच्या दिवशीच वकील गुणरत्ने सदावर्ते यांनी 'जरांगेंना अटक करा,' असे पत्र गृहखात्याला दिल्याने खळबळ उडाली आहे. यावरून राजकारण पेटण्याची दाट शक्यता आहे. "मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटी येथे होणारी सभा हिंसक होईल, सभेला परवानगी देऊ नका, जरागेंना तातडीने अटक करा," अशा मागणीचे पत्र गुणरत्ने सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांना व गृहसचिवांना दिले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.