Political News: गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, आज त्यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला. तसेच आपण राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना भेटल्याच्या चर्चां त्यांनी फेटाळून लावल्या.
"पाठीत खंजीर खुपसण्याचं माझं रक्त नाही. माझ्या भूमिकेची प्रतारणा करणाऱ्या भूमिका आजूबाजूला आहे, त्यामुळे मी कन्फ्यूज आहे. मी गेल्या २० वर्षांत एकही सुट्टी घेतलेली नाही. त्यामुळे मला एक-दोन महिन्याच्या सुट्टीची गरज आहे. मला अंतर्मुख होण्याची गरज आहे", असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मात्र, पाठीत खंजीर खुपसण्याचं माझं रक्त नाही, त्यांच्या या विधानामुळे पंकजा मुंडे यांचा रोख नेमकी कुणाकडे आहे? याबाबत आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
पंकजा मुंडेंनी काय गौप्यस्फोट केला?
पंकजा मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या, "गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी पक्षाकडून मला फॉर्म भरण्याचे आदेश आले होते.
त्यानंतर सकाळी नऊ वाजता फॉर्म भरायला या, असंही सांगण्यात आलं होतं. मात्र, फॉर्म भरायच्या आधी १० मिनिटं फोन आला अन् सांगितलं की, तुम्ही फॉर्म भरू नका. त्यानंतर जैसे आपकी आज्ञा असं म्हणत मी पक्षाचा आदेश कायम शिरसावंद्य मानला", असा गौप्यस्फोट पंकजा मुंडेंनी केला आहे.
त्या पुढे म्हणाल्या, "त्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या की, मी पक्षावर नाराज आहे. पण मी पक्षाविरोधात काय केले, ज्याने माझ्या नैतिकतेवर प्रश्न उभे केले जातात. आता मी काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण मी राजकारण करेन किंवा नाही करेन. मात्र, मला जे करायचं ते डंके की चोट पर करेन", असंही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
Edited By : Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.