Thane News : शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या घरात चोरी; रोकडसह 43 लाखांच्या ऐवजावर डल्ला

Theft at Former Corporator Bhushan Bhoir Home in Thane : ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच्या घरी चोरी...
Thane News
Thane NewsSarkarnama
Published on
Updated on

Thane Crime News :

ठाण्यातील शिंदे गटाचे माजी नगरसेवक भूषण भोईर यांच्याकडे घरातून डीमार्ट पिशवीत आणि हॅन्ड बॅगेत अशी ठेवलेली 16 लाखांच्या रोकडसह एकूण 43 लाख 60 हजारांच्या ऐवजावर चोरट्याने डल्ला मारल्याची बाब समोर आली आहे.

या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी शैलेश नावाच्या तरुणाला अटक केली. त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच अटकेतील तरुण हा भोईर यांच्या ओळखीचा असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Thane News
Jitendra Awhad on Ajit Pawar : जनाची नाही मनाची असेल तरी एखादा राजीनामा देईल; आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा

माजिवाडा येथील एका गृहसंकुलात राहणारे माजी नगरसेवक भूषण भोईर यांच्या पत्नी सपना भोईर यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भोईर हे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर यांचे पुत्र, तर स्थायी समिती माजी सभापती संजय भोईर यांचे भाऊ आहेत. ते शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तक्रारदार सपना यांना रविवारी एका कार्यक्रमासाठी जायचे होते. त्यासाठी त्यांनी दागिने परिधान करण्याकरिता घरातील कपाट उघडले. त्यावेळी कपाटात त्यांना दागिने आढळून आले नाही. तसेच घरातील रोकडही गायब झाल्याची बाब निदर्शनास आली. ( Thane Politics News )

अशाप्रकारे घरातून 16 लाख रुपयांची रोकड, 15 तोळ्यांचा सोन्याचा हार, 12 तोळे वजनाची सोन्याची कंठी, 13 तोळे वजनाचा शाही हार, सहा तोळे वजनाच्या कानातले सोन्याचे दागिने असा एकूण 43 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

R

Thane News
Loksabha Election 2024 : दोन प्रिन्स 24 तासांत ठाणेकरांच्या भेटीला; एक गरजले, दुसरे शांतपणे निघून गेले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com