Jitendra Awhad on Ajit Pawar : जनाची नाही मनाची असेल तरी एखादा राजीनामा देईल; आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा

NCP latest News : अजित पवार यांच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात, शरद पवार यांना पक्ष आणि पक्षचिन्ह मिळू नये, अशी भूमिका मांडली
Jitendra Awhad , Ajit Pawar
Jitendra Awhad , Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP case in SC राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडणूक चिन्हासाठी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी पक्षाच्या वादावर अजित पवारांनी केलेल्या राजकारणाची तुलना पाकिस्तानातील राजकारणाशी केली. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी न्यायालयाने केलेली तुलना ऐकून एखाद्याला जनाची नाही, तर मनाची लाज असेल तर तो न्यायालयाचे हे वक्तव्य म्हणजे चपराक आहे, हे ओळखून स्वत:हून राजीनामा देईल, असे म्हणत अजित पवारांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला मिळाल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार (NCP SHARAD PAWAR) हे नाव दिले होते, परंतु शरद पवार गटाने मूळ राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने सुनावणी घेत अजित पवार (AJit Pawar) गटाला नोटीस बजावली आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरद पवार हे नाव कायम ठेवण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय शरद पवार गटाने नवीन चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा आणि आयोगाने 7 दिवसांत निवडणूक चिन्ह द्यावे, असे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jitendra Awhad , Ajit Pawar
Ajit Pawar : ...तसं तुम्ही करु नका; अजितदादांनी कार्यकर्त्यांना केले सावध...

या संपूर्ण सुनावणीदरम्यान आयोगाने राष्ट्रवादीच्या या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की शेजारील राष्ट्राशी आम्हाला तुलना करायची नाही. मात्र, तिथे बॅट चिन्ह हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तिथे निवडणुकीचे चित्र काय होते हे तुम्हाला माहिती असेलच. तसेच दोन्ही गटांनी पक्षाच्या घटनेची पायमल्ली केली आहे. त्यामुळे ज्या मतदाराने तुम्हाला मतदान केले, तो काय विचार करत असेल? असा सवालही केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या या सुनावणीवर जितेंद्र आव्हाड (Jitedra awhad) यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, न्यायालयात झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाकडून जोरदार विरोध करण्याचा प्रयत्न झाला. अजित पवार यांच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात, शरद पवार यांना पक्ष आणि पक्षचिन्ह मिळू नये, अशी भूमिका मांडली. म्हणजेच शरद पवार नावाच्या सूर्याचा अस्त करावा, अशीच अजित पवार गटाची इच्छा त्यांच्या वकिलांनी वादविवादात पुढे आणली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने, "भारतात लोकशाही आहे अन् लोकशाहीत कोणत्याही माणसाला पक्ष आणि चिन्ह न देणे हे अयोग्यच असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या देशाच्या सीमेपलीकडे असलेल्या पाकिस्तानात (Pakistan) काय झालंय?"असा सवाल करीत भारतातील महाराष्ट्रातील राजकारणाची पाकिस्तानातील राजकारणाशी तुलना केली.

म्हणजेच, सर्वोच्च न्यायालयाने, अजित पवार यांच्या वकिलांनी जे मुद्दे मांडले; त्यातून शरद पवार यांना पक्ष आणि चिन्ह मिळू न देता त्यांचा राजकीय अस्त करण्याचा अजित पवार यांचा कट उधळून लावला आहे. तसेच अपात्रतेची याचिका प्रलंबित असतानाच पक्षाबाबतचा निर्णय आलाच कसा? असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने आगामी सात दिवसांत शरद पवार यांना चिन्ह देण्याचे आदेश दिले. तसेच, निवडणूक आयोगाने जे नाव दिले आहे, तेच नाव प्रक्रिया सुरू असेपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश दिले. हा निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने भारतातील लोकशाही वाचली पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. ही आपणासाठी आश्वासक बाब असल्याचेही आव्हाड म्हणाले.

Jitendra Awhad , Ajit Pawar
Sharad Pawar : सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारले; आता शरद पवार काय म्हणाले?

मात्र, न्यायालयात जे काही घडलं आणि सुनावणीदरम्यान दोन न्यायाधीशांच्या तोंडून जे ऐकलं ते यातना देणारे होते. शरद पवार यांना संपवण्यासाठी लोक ज्या पातळीवर घसरले आहेत, त्यांच्याकडून अशी अपेक्षाच ठेवणे चुकीचे आहे. महाराष्ट्रात अजित पवार यांनी केलेल्या राजकारणाची तुलना न्यायाधीशांनी थेट पाकिस्तानातील राजकारणाशी केली, याची लाज वाटली. महाराष्ट्राची पाकिस्तानसोबत केलेली तुलना ऐकून मराठी माणूस म्हणून मला खूपच खेदजनक वाटत आहे. तसेच या प्रकारानंतर जर जनाची नव्हे तर मनाची लाज असेल तर आपण केलेले कृत्य हे सर्वोच्च न्यायालयाने मारलेली चपराक आहे, हे ओळखून एखादा राजीनामा देईल, अशी टीका त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता आपल्या एक्स हॅण्डलवरून केली आहे.

R

Jitendra Awhad , Ajit Pawar
Chandigarh Mayrol Polls : सरन्यायाधीशांचा दणका; ‘ती’ आठ मतं वैध ठरवत पुन्हा मतमोजणीचे आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com