Ajit Pawar Press : '...तर राजकारण सोडेन, असा आरोप माझ्यावर करायचा नाही'; अजितदादांनी खासदारांना सुनावले !

Ajit Pawar Criticize On Mp krupal Tumane : "उचलली जीभ लावली टाळ्याला.."
Ajit Pawar Criticize On Mp krupal Tumane :
Ajit Pawar Criticize On Mp krupal Tumane : Sarkarnama

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व खासदार कृपाल तुमाने (Krupal tumhane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. महाविकास आघाडी सरकारात अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना आर्थिक गैरव्यवहार करत होते, असा आरोप खासदार तुमानेंनी केला होता, यावर आता अजित पवार यांनी तुमानेंना प्रत्युत्तर देत त्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar Criticize On Mp krupal Tumane :
Shivsena UBT News : तरुणांना आकर्षित करण्यासाठी ठाकरे गटाचा 'हा' नवा फंडा; आदित्य ठाकरेंची ट्विटद्वारे घोषणा

आजच्या पत्रकारपरिषेदेत अजित पवार यांना तुमानेंनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया विचारले असता अजित पवार आक्रमक होत, त्यांचा खरपूस समाचार घेतला. पवार म्हणाले, "महाराष्ट्रातील एका व्यक्तीने जरी सांगितलं ना, मी राजकारण सोडेन. त्यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावं. त्यांनी जर सिद्ध करून नाही दाखवलं तर खासदार तुमानेंनी घरी बसावं. हा असला आरोप माझ्यावर करायचा नाही. तुम्ही खासगीत आमदारांना पण विचारा माझ्या कामाची पद्धत कशी होती. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला," असा जोरदार समाचार अजित पवारांनी घेतला.

Ajit Pawar Criticize On Mp krupal Tumane :
Protest Of Disabled In Satara: पालकमंत्र्यांच्या घरासमोर दिव्यांगांचे आंदोलन; आत्मदहनाचा इशारा अन्‌ पोलिसांची जबरदस्ती

राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून टोला :

राज्य मंत्रिमंडळाचा (Cabinet Expansion) विस्तार करायचा की नाही, करायचा तर कधी करायचा याचा पूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. कदाचित वीस जणांचे छोटे मंत्रिमंडळ त्यांना पुरेसे वाटत असेल, महिलांना मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व न देणे त्यांना योग्य वाटत असावे, असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com