
Mumbai : मागील वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांसह १३ खासदारांनी बंडखोरी केली होती. वर्षभराच्या कालावधीत मोठी पडझड अनुभवलेल्या ठाकरे गटानं पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. याचाच भाग म्हणून तरुणांना आकर्षित करण्यासाठी तसेच राज्यातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (ठाकरे गट) 'शिवसेना पॉडकास्ट' स्वरुपात येत आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत मोठी घोषणा केली आहे. यात तरुणांना आकर्षित करण्यासाठी तसेच राज्यातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच 'शिवसेना पॉडकास्ट' स्वरुपात समोर येणार आहे. 'आवाज महाराष्ट्रा'चा असं या पॉडकास्टचं नाव असून यामध्ये शिवसेनेची अधिकृत भूमिका आणि विविध राजकीय विषयांवर चर्चांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सध्या पॉडकास्ट हा प्रकार विशेषतः तरुणांमध्ये मोठं आकर्षणाचा विषय ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर तरुण वर्गाला आकर्षित करण्याचा ठाकरे गटानं मोठं पाऊल उचललं आहे. आता ठाकरे गट पॉडकास्ट माध्यमातून आपली भूमिका जनतेसमोर मांडणार आहे. मात्र, या कधीपासून सुरु होणार याबाबत अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र ज्या युट्यूब चॅनेलवरुन हे पॉडकास्ट प्रसारित होणार आहे. त्या 'ShivSena UBT या चॅनेलवर सध्या शिवसेनेनं २०१९ मध्ये आलेलं 'शिवसेना गीत' अपलोड करण्यात आलं आहे.
काय आहे आदित्य ठाकरेंचं ट्विट ?
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेने(Shivsena)च्या युट्युब चॅनेलवर सुरू करण्यात येत आहे. जनतेच्या मनातले प्रश्न त्यासोबतच महाराष्ट्राचे भविष्याचा विचार मांडणार आहेत. त्यासोबतच स्पष्ट आणि खणखणीत माहिती आता या "आवाज कुणाचा" ठाकरे गटाच्या पॉडकास्टमधून ऐकायला मिळणार आहे.
आगामी निवडणुकांचा विचार करता शिवसेना ठाकरे गटाची भूमिका लोकांचे प्रश्न आणि त्याची उत्तरे कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम हे सगळं या पॉडकास्ट(Podcast)च्या माध्यमातून दिली जाणार आहे. तसेच तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहचवण्याचा प्रयत्न ठाकरे गटाचा असणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.