Uddhav Thackeray News : महाराष्ट्रापासून मुंबई तोडणारांचे आम्ही तुकडे करु ; उद्धव ठाकरेंचा इशारा

Mahavikas Aghadi News : वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे यांचा भाजपला इशारा
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

Uddhav Thackeray Mumbai BKC News : मोठ-मोठी कार्यालयाये मुंबईतून बाहेर नेली जात आहेत. अनेक कार्यालये गुजरातला नेली आहेत. मुंबई तोडू शकत नाही, जो इशारा तेव्हा बाळासाहेबांनी दिला होता. तोच आम्ही आज देतो आहोत, तो म्हणजे मुंबई तोडणारांचे आम्ही तुकडे करु तो कुणीही असो, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुंबई तोडता येत नाही, म्हणून कार्यालये पळवत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या 'वज्रमूठ' सभेमध्ये केला. मुंबईतील बिकेसी मदैनावर झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मेट्रोवरुन टीका केली. मेट्रोची कारशेड आरेमध्ये नको, असे म्हटले होते. आमचे सरकार गद्दारी करुन पाडल्यानंतर कांजूरच्या जागेवरचे सगळे निर्बंध हटवण्यात आले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मुंबईची लुट केली जात आहे. बाळासाहेबांचे विचार शिल्ल्क असते तर गद्दारीच केली नसती, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.

Uddhav Thackeray
Ashok Chavan News : 'हमारे पास उद्धव ठाकरे, अजितदादा और पटोले है!' चव्हाणांची जोरदार फटकेबाजी

भाजपचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि बाबरी मशीदीबाबात वक्तव्य केले होते. त्याचा समाचार ठाकरे यांनी घेतला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, बाबरी मशीद पाडली तेव्हा, कशी पळापळ झाली होती. चंद्रकांतदादा भाजपवाले कुठे होते, असा सवाल त्यांनी केला. कर्नाटक निवडणुकीमध्ये भाजपच्या जाहिरनाम्यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपला फटकारले. २०१४ मध्ये सांगितले होते अच्छेदिन येतील. आले का अच्छेदीन, असा सवला त्यांनी केला.

बारसूमध्ये आम्ही ठरवले होते, लोकांची मान्यता मिळाली तरच प्रकल्प होईल हे आमचे धोरण होते. कोकणातील शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी ठाकरे यांनी केली. पाण्याची गरज भागवण्यासाठी धासडी निर्णय घेतला. समृद्राचे पाणी शुद्ध करुन मुंबईकरांना पीण्यासाठी वापरणार होतो. मात्र, त्याला स्थगिती देण्यात आली आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray
Aditya Thackeray : आमच्याकडे खुर्च्या रिकाम्या राहत नाहीत...आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं

सत्यपाल मलिक यांनी एक गोप्यस्फोट केला. गौतम आदानींची चौकशी करुच नका, त्याचे चरित्र शालेय पुस्तकात लावा, असा टोला ठाकरे यांनी लगावला. सत्यपाल मलिकांच्या गोप्यस्फोटाचे काय? असा सवला त्यांनी केला. हे राज्यकर्ते इतिहास पुसत आहेत. चीनच्या माने ईडी लावा, मागे येते का पहा, आदानींबद्दल कोणीच बोलायला तयार नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com