Shivsena Disqualification Case : ठाकरे गटाची अस्वस्थता वाढणार; शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर पडणार?

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी बजावलेल्या नोटीशीला शिंदे गटातील आमदारांचे उत्तर
Uddhav Thackeray, Rahul Narvekar, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Rahul Narvekar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena 16 MLA Disqualification : शिवसेनेतून सुरुवातीला फुटलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली होती. या नोटीशीला उत्तर देताना शिवसेनेच्या ४० आमदारांनी मुदत वाढवून मागितल्याचे समजते. परिणामी शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण आता लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यामुळे शिवसेनेतील ठाकरे-शिंदे गटातील संघर्षाला नवे वळण लागण्याची शक्यता आहे. (Latest Political News)

Uddhav Thackeray, Rahul Narvekar, Eknath Shinde
Ajit Pawar CM : पृथ्वीराज चव्हाणांची भविष्यवाणी शंभूराज देसाईंच्या जिव्हारी; म्हणाले, "बाबांना 'वाण नाही पण..."

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर बंडखोर १६ आमदारांविरोधात ठाकरे गटाकडून अपात्रेबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष विहित वेळेत घेतील, असे स्पष्ट केले. यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटीस बजावली होती. या नोटीशीला उत्तर देताना या आमदारांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. सध्या विधीमंडळ कामकाज सुरु असल्याने किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray, Rahul Narvekar, Eknath Shinde
Monsoon Assembly Session : विधिमंडळात आज 'या' विषयांवरून होणार घमासान; विरोधकांची रणनीती काय?

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष आणि सचिव यांच्यात बैठकी झाल्याची माहिती आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदारांनी मुदत वाढवून मागितली होती. तसेच १४ आमदारांच्या उत्तराचा आढावा घेणे बाकी असल्याचीही माहिती आहे. तसेच सध्या विधीमंडळाच्या कामकाजामुळे या आमदारांना किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Uddhav Thackeray, Rahul Narvekar, Eknath Shinde
Nitin Gadkari on Politics : ..तर लोक जातीपातीच्या वर उठून मतदान करतील...; गडकरींनी सांगितला निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला...

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर शिवसेनेच्या शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णयास विलंब होत असल्याचे सांगत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्यात संबंधित आमदारांबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. आता शिंदे गटातील आमदारांनी मागितलेली मुतदवाढ आणि सुरू असलेले विधीमंडळाचे कामकाज यामुळे १६ आमदारांच्या आपत्रतेवरील निर्णय लांबवणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com