काँग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी होवू शकत नाही : नाना पटोले

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) व ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतली.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

मुंबई - देशात भाजपच्या विरोधात जात महाराष्ट्रात तीन पक्षांनी महाविकास आघाडी केली. भाजप विरोधातील या राजकीय प्रयोगाचे आकर्षण तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनाही आहे. ते महाराष्ट्र दौऱ्यावर आले असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) व ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांची भेट घेतली. यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी भाजप विरोधातील आघाड्यांसंदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ( There can be no anti-BJP alliance except Congress: Nana Patole )

नाना पटोले म्हणाले, तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भाजपविरोधी आघाडी बनवण्यासाठी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. भाजपचा खरा चेहरा त्यांच्या लक्षात आला असून भाजपच्या हुकुमशाही विरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा त्यांचा प्रयत्न स्वागतार्ह आहे. पण काँग्रेस पक्षाशिवाय भाजपविरोधातील आघाडी पूर्ण आणि यशस्वी होणार नाही, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

Nana Patole
Video: राज्यसरकार अजित पवार यांच नसून उद्धव ठाकरे यांच - नाना पटोले

ते पुढे म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार हुकुमशाही वृत्तीने वागत आहे. संविधान आणि लोकशाही संपवण्याचे आणि देशाची मालमत्ता विकण्याचे काम सुरु आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणाऱ्या मित्र पक्षांनाही संपवत आहे. याचा अनेक पक्षांना अनुभव आल्याने आता ते पक्ष भाजपपासून दुरावले आहेत. के. चंद्रशेखर राव यांनी उघडपणे केंद्रातील भाजप सरकारविरोधी भूमिका घेऊन भाजप विरोधात आघाडीसाठी प्रयत्न चालवले आहेत.

Nana Patole
काॅंग्रेसच्या मंत्र्यांची खाती बदलणार का, यावर नाना पटोले म्हणाले...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही अशा आघाडीसाठी विविध राज्यात जाऊन नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. पण पुढे यासंदर्भात काही ठोस घडले नाही. के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगाणा राष्ट्र समितीने लोकसभा आणि राज्यसभेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होईल अशा भूमिका घेतल्या होत्या मात्र आता भाजपबद्दलचे त्यांचे विचार बदलले आहेत. भाजप हा लोकशाही आणि संविधानविरोधी असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो.

Nana Patole
संजय राऊत अन् विनायक राऊत ठाकरेंचे पाळलेले कुत्रे; राणेंची जीभ पुन्हा घसरली

के. चंद्रशेखर राव यांच्याप्रमाणेच विविध राजकीय पक्ष आणि देशातील सर्वसामान्य जनतेला भाजपचा खरा चेहरा लक्षात आला असून देशातील जनता भाजपला सत्तेवरून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस आणि मित्रपक्षांची यूपीए आघाडी हीच भाजपाविरोधात सक्षम पर्याय असून काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांची भाजपला पर्याय होऊ शकत नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com