Sharad Pawar Vs Ajit Pawar :
Sharad Pawar Vs Ajit Pawar : Sarkarnama

NCP Crisis News : 'पक्षात फूटच नाही मग माझा फोटो वापरू नका का म्हणता?' दादा गटाचा पवारांना सवाल !

Sharad Pawar Vs Ajit Pawar : आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना फ्लेक्सवर फोटो लावू नका असं का म्हणता?
Published on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले. अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला, तर अध्यक्ष शरद पवार यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत सामील होऊन, आपला लढा भाजप विरोधात असल्याचे जाहीर केले. सोबतच अजित पवार गटाला आपला फोटो वापरू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करू असे ही त्यांनी स्पष्ट केले. मात्र आज अजित पवार हे आमचेच नेते आहेत, पक्षामध्ये कसलीही फूट पडलेली नाही, असे मोठे विधान शरद पवार यांनी आज (दि.२५ ऑगस्ट) रोजी केल्यानंतर नव्या चर्चांना फोडणी मिळाली आहे.

Sharad Pawar Vs Ajit Pawar :
Sharad Pawar News : शरद पवारांचे मोठं विधान ; अजित पवार हे आमचेच नेते, राष्ट्रवादीत फूट पडलेली नाही..

शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर अजित पवार समर्थकांकडून सवाल उपस्थित विचारले जात आहेत. 'शरद पवार यांच्या ताज्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम पसरत आहे. जर पक्ष फुटला नाही म्हणणं असेल, तर मग आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना फ्लेक्सवर फोटो लावू नका असं का म्हणता? स्वतःच्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकत्यांना फोटो लावू नका म्हणणे, म्हणजे ते पक्षाशी संबंधित नाहीत, असं दाखवणे, असा अर्थ होत नाही का? असे सवाल अजित पवार गटाकडून उपस्थित केले आहेत. (Latest Marathi News)

नेमके काय म्हणाले शरद पवार?

"काही लोकांनी पक्ष सोडून वेगळी भूमिका घेतली आहे, तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे. त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच पक्षात फूट म्हणायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय आहे," असे पवार म्हणाले.

Sharad Pawar Vs Ajit Pawar :
NCP Janata Durbar: सकाळी मुश्रीफ, दुपारी धनूभाऊ, तर संध्याकाळी तटकरे, भुजबळ, वळसे लोकांची गाऱ्हाणे ऐकणार

सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य-

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही, आमच्यातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी आमचा पक्ष एकच आहे. अजित पवार हे आमच्याच पक्षाचे नेते आहेत," असा दावाही खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होता. सुळेंच्या वक्तव्याला आज शरद पवारांनी दुजोरा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com