शिंदेंच्या बंडामागे ना फडणवीसांची फूस, ना ठाकरेंवर नाराजी; खरा रोष अजित पवारांवर

Eknath Shinde|Ajit Pawar : पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी आजतागायत कोणतीच भूमिका घेतली नाही.
Eknath Shinde News, Ajit Pawar Latest News
Eknath Shinde News, Ajit Pawar Latest News Sarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नाराजी नाट्यामागे शिवसेना नेतृत्व असल्याचे सांगण्यात येत असले तरीही, त्यामागे खरेखुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सरकारमधील 'स्टाईल' हेच कारणीभूत आहे, असे शिंदे समर्थक आमदार सांगत आहेत. (Eknath Shinde & Ajit Pawar Latest Marathi News)

शिवसेना आमदारांना डावलून त्याच मतदारसंघात पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना पवार हे ताकद देत असल्याची तक्रार शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांची आहे. सतत हेच घडत असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत का राहायचे, असा प्रश्नही शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वापुढे ठेवला आहे. त्यामुळे शिंदेंच्या बंडामागे ना देवेंद्र फडणवीस यांची धूस आहे, ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत नाराजी. खरा रोष आहे, तो उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'वर्किंग स्टाईल' वर. सत्तेत राहूनही अजितदादा आमदारांचे तोंड दाबत असतील, तर सत्ता का हवी, असा प्रश्नही शिंदे विचारत आहेत. (Ajit Pawar Latest News in Marathi)

Eknath Shinde News, Ajit Pawar Latest News
भाजपच्या भुमिकेनं सस्पेन्स वाढला; शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव नाही

शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन सुरतमध्ये गेल्याची आणि ते बंड करण्याची शक्यता असल्याने अलर्ट झालेल्या शिवसेना नेतृत्वाने शिंदे यांची पक्षाच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर शिंदे यांच्या बंडामागची अनेक कारणे पुढे आहेत. त्यात गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विशेषत प्रमुख मंत्री शिवसेनेच्या आमदार आणि काही आमदारांना जुमनत नसल्याचे याआधी आता उघडपणे सांगत आहेत.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. मात्र, राज्याची सारी सूत्रे राष्ट्रवादीकडे अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याची वागणूक मिळत आहे, अशी तक्रार शिवसेना आमदारांनी अनेकदा केली आहे. तशी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कानावरही घातली आहे. मात्र, तरीही त्यावर तोडगा निघाला नाही आणि गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी विशेषत: अजित पवार यांनी आपल्याच पक्षाचा अजेंडा राबविल्याचे गाऱ्हाणे आहे.

Eknath Shinde News, Ajit Pawar Latest News
साताऱ्यातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी....

पवार यांच्याकडे अर्थखाते असल्याने ते शिवसेनेच्या आमदारांना जाणीवपूर्वक टाळून, त्याच मतदारसंघातील तेही राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना मदत करीत असल्याचे शिवसेनेच्या आमदारांनी वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. परंतु, पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी आजतागायत कोणतीच भूमिका घेतली नाही. त्याचाच परिणाम, राज्यसभा आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकांत झाल्याचे उदाहरणे शिवसेना आमदार देत आहेत.

Eknath Shinde News, Ajit Pawar Latest News
शिंदे-ठाकरेंची फोनवरुन चर्चा : पवार, राऊतांच्या कारभारावर बोट; भाजपसोबत सरकारची मागणी

या निकालानंतर शिंदे यांनी सरकारमधून आपला गट बाजुला करण्याची भूमिका घेतली आणि थेट ठाकरे यांनाच आव्हान दिले. त्यामागे मूळ कारण हे अजित पवार असल्याचे कारण शिंदे समर्थक आमदार देत आहेत. त्यामुळे शिवसेनेतील नाराजीनाट्य हे अजित पवार यांच्याभोवती फिरण्याचे चिन्हे आहेत. सत्तेत असो अथवा नसो तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचा जाचक कमी होत नसल्याने त्यांच्यासोबत राहण्याचा प्रश्न येत नाही. दुसरीकडे, काँग्रेसही आपल्या मूळ धोरणाविरोधांत आहेत, त्यांच्याशी सलगी नुकसान होत असल्याकडे शिंदे आणि त्यांचे आमदार लक्ष वेधत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com