Dilip Walse Patil on Sharad Pawar : शरद पवार आपले नेते ; चुकीचे काही बोलू नका : बंडानंतर वळसे पाटील प्रथमच बोलले

NCP News : मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर वळसे पाटील यांचे आंबेगाव तालुक्यात आगमन झाले.
Sharad Pawar, Dilip Walse Patil
Sharad Pawar, Dilip Walse Patilsarkarnama
Published on
Updated on

-डी. के. वळसे पाटील

मंचर : राष्ट्रवादी काँग्रेस फूटल्यानंतर शरद पवारांचे विश्वासू सहकारी दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आंबेगाव येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी वळसे-पाटलांनी शरद पवार यांच्याविषयी कोणी काही बोलू नका, अशी सूचना कार्यकर्त्यांना आणि मान्यवरांना दिली.

मंचर तालुका आंबेगाव येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या मेळाव्यात वळसे पाटील यांनी ही सूचना केली आहे. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर वळसे पाटील यांचे आंबेगाव तालुक्यात आगमन झाले. पेठ ,भोरवाडी, शेवाळवाडी मंचर येथे फटाक्याच्या आतिशबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवगिरी कार्यालयात आंबेगाव -शिरूर मतदार संघातील महिला व युवकांची मोठी गर्दी झालेली आहे.

Sharad Pawar, Dilip Walse Patil
Sanjay Raut on Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा पचका झाला..,ढोंग उघडे पडले ; राऊत म्हणाले, "‘देशबुडव्यांच्या हाती महाराष्ट्र..’

माजी आमदार पोपटराव गावडे, अनुसया महिला उन्नती केंद्राचया अध्यक्ष किरण वळसे पाटील, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, विवेक वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, प्रकाश पवार आदिवासी समाजाचे नेते सुभाषराव मोरे, अभय आवटे शिवाजीराव ढोबळे गणपतराव इंदौरे , सचिन पानसरे ,निलेश थोरात, सविता बगाटे, दूध संघाच्या संचालिका केशर ताई पवार. मानसिंग भैय्या पाचुंदकर. यावेळी उपस्थित होते.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com