Maharashtra Politics : अशोक चव्हाणांपाठोपाठ काँग्रेसचा आणखी बडा नेता भाजपच्या वाटेवर...?

Loksabha Election 2024 : जे लोक आता येणार नाहीत, असे सांगत आहेत. ते लवकरच भाजपमध्ये दिसतील. अनेक लोकांना भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहात यावं, असं वाटतंय.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याचे नाव भाजप प्रवेशासाठी चर्चिले जात आहे. संबंधित काँग्रेस नेत्याने भाजप नेत्याची भेटही घेतल्याची चर्चा आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाचे संकटमोचक आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी त्याबाबत नेहमीप्रमाणे ताकास तूर लागू दिला नाही. असे असले तरी लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये खूपजण येणार आहेत, असे सूचक विधान मात्र केले. (Marathi Political News)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आठवडा उलटl नाही तोच पक्षाचा आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा रंगली आहे. माजी खासदार संजय निरुपम हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. निरुपम हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. (Mumbai Congress Leader )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress
Sharad Pawar Kolhapur Tour : पवारांसह बडे नेते आज कोल्हापुरात; ‘डिनर डिप्लोमसी’तून ठरणार महाआघाडीचा उमेदवार

निरुपम हे मुंबईतील उत्तर भारतीय नेत्यांचे प्रमुख नेते गणले जातात. त्यामुळे निरुपम यांना भाजपत आणून लोकसभेच्या काठावरील जागा निश्चित करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेता लोकसभा निवडणुकीत मुंबईत ते महत्त्वाचे ठरतात, हे ओळखूनच निरुपम यांच्यासाठी भाजपकडून प्रयत्न होऊ शकतात. (Congress News)

दरम्यान, संजय निरुपम यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टपणे काही सांगितले नाही. ते म्हणाले, संजय निरुपम हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत, याबाबत मला काही माहिती नाही. माझा आणि त्यांचा विशेष काही परिचय नाही. माझी आणि त्यांची भेटही झालेली नाही. महाजन असे म्हणत असले तरी बरेच लोक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सूचक विधान केले.

Congress
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार; 'स्वाभिमानी'च्या नव्या घोषणेने राजकीय गणितं बिघडणार ?

‘जे लोक आता येणार नाहीत, असे सांगत आहेत. ते लवकरच भाजपमध्ये दिसतील. अनेक लोकांना भारतीय जनता पक्षाच्या मुख्य प्रवाहात यावं, असं वाटतंय. सगळा देश आणि महाराष्ट्र मोदीमय झाला आहे. त्यामुळे अनेकांना भाजपत प्रवेश करायचा आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये येतील, असं कोणाला वाटलं होतं का? पण ते आले. काँग्रेसमध्ये आता मोठा नेता कोणी राहिला नाही. निवडणुकीपर्यंत त्यांच्या पक्षाचं काय होईल, हे काय सांगता येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर खूप लोकं भाजपमध्ये येतील, असंही महाजन यांनी स्पष्ट केले.

संजय निरुपम यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले, काल तर माझेही नाव भाजप प्रवेशासाठी चर्चेत आले हेाते. कोणी तर नाव काढतं आणि मीडिया चालवतो. ते योग्य नाही. पण, अशोक चव्हाण यांचं नाव चालवलं आणि ते गेले असं विचारताच त्यांनी ‘तो तुमचा परिणाम आहे,’ असे सांगून काढता पाय घेतला.

R

Congress
Balasaheb Thackeray News : ‘भाजपच्या षडयंत्राला कंटाळून बाळासाहेबांनी तेव्हाच काँग्रेसशी युतीचा निर्णय बोलून दाखवला होता’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com