Cabinet Expansion News : सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडून शिंदे-फडणवीसांना निमंत्रणच नव्हतं!

Maharashtra Politics : माहितीच्या अधिकारातून माहिती मिळाल्याचा राष्ट्रवादी खळबळजनक दावा
Eknath Shinde, Devendra Fadanvis
Eknath Shinde, Devendra FadanvisSarkarnama

Cabinet Expansion : नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. त्या बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे शिक्कमोर्तब झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्याला माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीचा आधार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी शिंदे आणि फडणवीसांमध्ये मंगळवारी (दि. २४) आर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. त्यानंतर शाह यांनी फडणवीस यांच्यासोबत एक स्वतंत्र बैठक घेतल्याची माहिती आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत राज्यात लवकरच दुसरा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान शिंदे गट आणि भाजपला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडून सरकार स्थापनेसाठीच निमंत्रण नसल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

Eknath Shinde, Devendra Fadanvis
Cabinet expansion News : फडणवीसांच्या वक्तव्यानंतर शिरसाट, कडू अ्न गोगावलेंच्या आशा पल्लवित

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, "महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाला आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. याबाबत माहितीच्या अधिकारातून माहिती मिळाली आहे."

राज्यात सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होण्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने केल्याल्या दाव्यामुळे राज्यातील राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या आरोपांमुळे शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे राजकिय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Eknath Shinde, Devendra Fadanvis
Shivsena News : शिंदे-ठाकरे गटात लागली स्पर्धा ; पश्चिममध्ये रामकथा विरुद्ध हळदी कुंकू..

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला हा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगून खोडून काढण्याचा प्रयत्न केला. फडणवीस म्हणाले, "हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे या प्रकरणासंबधीत असलेली सर्व कागदपत्रं राज्यपाल कार्यालयाकडे नाहीत."

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. यानंतर 12 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

शपथ घेतल्यानंतरही खाते वाटप करण्यासही शिंदे-फडणवीस सरकारने विलंब केला होता. आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची अनेकांना प्रतीक्षा आहे. त्यातच राष्ट्रवादीने केलेल्या दाव्यामुळे राज्यात आता काय होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com