Mumbai News : विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत दोन दिवसीय बैठकीचा आज समारोप झाला. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बैठकीत झालेल्या तीन ठरावांबाबत आमदार आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली.
आदित्य ठाकरे म्हणाले, 'आजच्या बैठकीत तीन ठराव मंजूर करण्यात आले, यातील पहिला म्हणजे, इंडिया आघाडीत आम्ही आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुका एकत्रितरित्या लढवू. दुसरा ठराव, देशातील सार्वजनिक मुद्द्यावरून रॅली काढल्या जातील आणि तिसरा म्हणजे, लवकरात लवकर समन्वयाने जागावाटपाचे सुत्र ठरवले जाईल, असे ठराव आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. तसेच, "जुडेगा भारत जुडेगा इंडिया" इंडिया आघाडीचा नारा असेल, अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली.
मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकीला देशभरातील २८ विरोधीपक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याही समावेश आहे. आजच्या बैठकीत १३ नेत्यांची समन्यवयक समितीही स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीचे निमंत्रक उद्धव ठाकरे म्हणाले, जसेजसे आपण एक एक पाऊल पुढे टाकत आहोत तसतसे भाजपमध्ये धाकधुक वाढू लागली आहे. इंडिया' ही विरोधी पक्षांची आघाडी नाही असं मी पहिल्यांदाच म्हणालो होतो. पण इंडियाचे विरोधक कोण आहेत हे तुम्हाला चांगलच माहिती आहे. आजच्या बैठकीत चांगले निर्णय घेण्यात आले, आगामी निवडणुकीत आम्ही हुकुमशाही विरोधात लढू, जुमलेबाजांच्या विरोधात लढू.
इतकेच नव्हे तर आम्ही मित्रपरिवार वादाच्या विरोधातही नक्कीच लढू. सबको लाथ और मित्रपरिवार को साथ, हे आम्ही चालू देणार नाही. ही लढाई दिवसेंदिवस वाढतच राहिल. लोकांच्या मनात एक भिती आहे. मी लोकांना इतकचं सांगू इच्छितो की, घाबरू नका, या भितीच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी नमुद केलं.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.