State Government Cabinet Meeting : शिंदे फडणवीस सरकारचा 'हा' मोठा निर्णय ! तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार

Shinde Fadnavis Government Big Decision : पहिली ते आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येतो.
Devendra Fadnavis-Eknath Shinde
Devendra Fadnavis-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने बुधवारी (दि.२८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य जनतेसाठी फार महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. या वर्षापासून आता राज्य सरकारने दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनाही मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तब्बल 12 लाख विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी(दि.२८) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' समुद्र सेतू असं नाव देण्यात आलं आहे. तर 'एमटीएचएल'ला 'अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू' असं नाव देण्यात आलं आहे. मंत्रिमंडळा(Cabinet Meeting)च्या आजच्या बैठकीत राज्यात नवी 9 वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच बैठकीत असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Congress Core Committee : आघाडीत घडामोडींना वेग; अधिवेशनापूर्वीच काँग्रेस लोकसभेच्या जागांबाबत घेणार मोठा निर्णय !

मोफत गणवेशाचा निर्णय...

इयत्ता पहिली ते आठवीमधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या विद्यार्थ्यां(Student)ना मोफत गणवेश देण्यात येतो. मात्र, आता राज्य सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यात या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांनादेखील देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील १२ लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिली ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीतील सर्व मुले आणि दारिद्रय़रेषेखालील पालकांची मुले यांना दोन गणवेशाचा लाभ राज्य सरकारकडून देण्यात येतो. आगामी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये ही योजना म्हणजेच हे मोफत गणवेश(Uniform) दारिद्र्यरेषेवरील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे. म्हणजेच सर्वच विद्यार्थ्यांना सरकार दोन गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार एक गणवेश शाळा व्यवस्थापन समिती आणि दुसरा गणवेश राज्य सरकार देणार असल्याचंही शिक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Mamata Banerjee Injured: ममता बॅनर्जींच्या हॅलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग: पायाला आणि पाठीला दुखापत

महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय...

मंत्रिमंडळाच्या बैठकीत असंघटीत कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो कामगारांना याचा लाभ मिळणार आहे. मुंबईतील दोन मोठ्या प्रकल्पांचा मार्ग मोकळा आज बैठकीतून मोकळा झाला आहे. बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक आणि स्टॉलधारकांची पात्रता निश्चित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड निश्चित करण्यात आला आहे.

राज्यात 9 वैद्यकीय महाविद्यालये सुरु होणार

राज्यावर जैविक संकट किंवा आरोग्याचं संकट आलं तर त्यावेळी राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम असली पाहिजे. त्यामुळे राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला आणखी सक्षम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यात नवी 9 वैद्यकीय महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Devendra Fadnavis-Eknath Shinde
Monsoon session News : पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात; नव्या संसद भवनात होणाऱ्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य काय?

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून फडणवीस यांची वचनपूर्ती करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आलं आहे. ठाणे, पालघर, जालना, बुलढाणा, अमरावती, वाशिम, भंडारा, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांत नवी वैद्यकीय महाविद्यालय सुरु होणार आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com