...ही तर रश्‍मीवहिनींना वाढदिवसाची ‘गिफ्ट’ !

गेल्या तीन आठवड्यांपासून दसरा मेळाव्याचा विषय राज्याच्या राजकारणात तापला होता.
Rashmi Thaceray-Uddhav Thackeray
Rashmi Thaceray-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : शिवतीर्थावर शिवसेेनेचा दसरा मेळावा घेण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. मुंबईतील महिला शिवसैनिकांनी थेट मातोश्री गाठत कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. रश्‍मी ठाकरे यांचा आज वाढदिवस असल्याने न्यायालयाचा निकाल म्हणजे वहिनीसाहेबांना वाढदिवसाचे गिफ्ट मिळाल्याची भावना महिला शिवसैनिकांनी यावेळी त्यांच्याकडे व्यक्त केली.

Rashmi Thaceray-Uddhav Thackeray
अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावर स्पष्टीकरणं म्हणाले,..मी गंमतीनं म्हणालो...

गेल्या तीन आठवड्यांपासून दसरा मेळाव्याचा विषय राज्याच्या राजकारणात तापला होता.न्यायालयाच्या निकालानंतर आज त्यावर पडदा पडला. मात्र, या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आला आहे. तरीही आजच्या निकालामुळे शिवसेनेच्या गोटात कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या विजयी घौडदौडीची ही सुरवात असल्याची भावना व्यक्त करीत फटाके फोडून आणि पेढे वाटून शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला.

Rashmi Thaceray-Uddhav Thackeray
अटकेच्या भीतीने राष्ट्रवादीचे नेते सपाटे झाले गायब; शिक्षिकेकडून अत्याचाराची फिर्याद

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेने केली आहे. न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आमच्यासमोर खुला असल्याचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले. या संदर्भातील अंतीम निर्णय शिंदे गटाकडून आता उद्या होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयात आम्ही आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, असे केसरकर यांनी सांगितले.

दरम्यान, दसऱ्या दिवशी (पाच ऑक्टोबर) शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावर तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा ‘बीकेसी’च्या मैदानावर होणार आहे. दोन्ही मेळावे एकाच दिवशी होणार असल्याने त्यादिवशी मुंबई पोलिसांवर मोठा ताण पडणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याने पोलिसांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्‍नावर उच्च न्यायालयात आज सुनावणीच्यावेळी चर्चा झाल्याने पोलिसांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com