Sanjay Raut on Shinde-fadanvis Govt : शेतकऱ्यांनी शिंदे सरकारच्या कंबरड्यात मारलेली ही पहिली लाथ: संजय राऊतांनी डिवचलं...

Maharashtra Politics| काल जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला आहे.
Sanjay Raut on Shinde-fadanvis Govt
Sanjay Raut on Shinde-fadanvis GovtSarkarnama

Sanjay Raut Criticized on Shinde-Fadanvis Government| कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला निर्विवाद यश मिळालं. शेतकऱ्यांनी शिंदे सरकारच्या कंबरड्यात मारलेली ही पहिली लाथ आहे, अशी सणसणीत टीका खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर केली आहे. काल जसे निकाल लागले तसेच यापुढही लागतील, महापालिका निवडणुका असोत, विधानसभा निवडणुका असोत वा लोकसभा, या पुढे असेच निकाल लागतील, असही त्यांनी म्हटलं आहे. (This is the first kick in the back of the Shinde government by the farmers Sanjay Raut said)

राज्यातील २५३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. २८ एप्रिलला राज्यातील १४७ बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या आणि शनिवारी (२९ एप्रिल) ला निकाल जाहीर झाले.तर आज उर्वरित ८८ बाजार समित्यांसाठी मतदान प्रक्रिया आणि निकाल जाहीर होणार आहे. काल जाहीर झालेल्या बाजार समित्यांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला आहे. (Maharashtra Politics)

Sanjay Raut on Shinde-fadanvis Govt
Vajramooth Meeting in Mumbai : मुख्यमंत्र्यांच्या होमपीचमधील वज्रमूठ सभेचे बॅनर हटवले ; आव्हाड संतप्त..

कालचा जो निकाल निकाल लागला आजही काही निकाल जाहीर होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांचे प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या संस्था आणि संघटना आहेत. पण शिवसेना यापुर्वी बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये उतरली नव्हती. पण यावळी शिवसेना यावेळी बाजार समित्यांच्या निवडणुकामंध्ये उतरली. पण आकडे पाहिले तर यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला निर्विवाद यश मिळालं आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातला ग्रामीण भागातील शेतकरी शिंदे-फडणवीस सरकारला वैतागला आहे. शेतकऱ्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कंबरड्यात ही पहिली लाथ मारली आहे. (Bazar Samiti Eletion Result)

मिंधे गटातील जे आमदार आहेत, त्यांच्या मतदार संघात शिवसेनेची (ठाकरे गट) पॅनल्स विजयी झाली आहेत. हा एक चांगला संकेत आणि लोकांच्या मन की बात स्पष्ट झाली आहे. जिथे जिथे शिवसेनेशी गद्दारी केलेले आमदार आहेत, तिथे तिथे शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) किंवा महाविकास आघाडीचे पॅनल्स विजयी झाले आहेत. ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर घाणेरडे आरोप केले, ते सगळे या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. हा लोकमताचा कौल असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com