Shivsena Symbol : शिंदेंना शिवसेना मिळाल्यानंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, हा निकाल अनपेक्षित..

Ajit Pawar : ''महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहतील''
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना मिळाली आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, ''हा अनपेक्षित असा निकाल आहे. निवडणूक आयोगाने निकाल देण्यासाठी एवढी घाई का केली. पण जो काही निर्णय आला त्याविरोधात उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात जातील. महाराष्ट्रातील शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहतील''.

''येणाऱ्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याच विचाराचे उमेदवार निवडूण येतील. शिवसेनेला मानणारा मतदार आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या पाठिमागे शिवसैनिक निश्चत राहतील'', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Ajit Pawar
Raj Thackeray Reaction : धनुष्यबाण शिंदेंना मिळाल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया : ‘पैसा येतो आणि जातो... नाव जपा... मोठं करा’

तसेच शिंदे गटाला शिवसेना (Shivsena) मिळाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचीही प्रतिक्रिया आली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आवाजातील एक व्हिडिओ ट्विट करत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Ajit Pawar
Shivsena Symbol : आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार!

राज ठाकरे यांनी एक व्हिडिओ ट्विट केला. त्यात त्यांनी म्हटले की, नाव आणि पैसा... पैसा येतो, पैसा जातो...पुन्हा येतो...पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही... ते येऊ शकत नाही. काळ्या बाजारासुद्धा मिळायचं नाही....म्हणून नावाला जपा... नाव मोठं करा, असा व्हिडिओ बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील त्यांनी ट्विट केला आहे.

Ajit Pawar
RSS : अदानी धोरण ठरवतात, भागवत मान्यता देतात आणि मोदी अंमलबजावणी करतात !

दरम्यान, पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्ही शिंदे गटाला मिळाल्यामुळे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. तसेच यावर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com