थोरात, पटोले, चव्हाणांच्या असमन्वयामुळे कार्यकर्ते गॅसवर

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची यादी अंतिम होत असताना दूसरीकडे मात्र काँग्रेसची यादी रखडल्याने महामंडळाच्या नियुक्त्यांना विलंब होत आहे.
Balasaheb Thorat, Nana Patole, Ashok Thorat
Balasaheb Thorat, Nana Patole, Ashok ThoratSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन होऊन आता दोन वर्षे झाली. पण अद्यापही कॉंग्रेसने (Congress) महामंडळावरील नाव निश्चित केलेली नाहीत. आधीच कोरोना संसर्गामुळे रखडलेल्या या नियुक्त्या आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole), मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यातील असमन्वयामुळे रखडल्या असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांनी यापूर्वीच महामंडळावरील नियुक्त्यांची यादी तयार करून दिल्लीला पाठवण्याचे आदेश दिले होते. पण तीनही नेत्यांमध्ये असमन्वयामुळे यादी बनण्यास उशीर झाल्याचे दिसत आहे.

Balasaheb Thorat, Nana Patole, Ashok Thorat
गुहागरच्या नगराध्यक्षांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सुनील तटकरेंची इच्छा पूर्ण झाली!

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुरुवातीला दौरे आणि नंतर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये व्यस्त होते, तर आता मंत्री अशोक चव्हाण देगलूर पोटनिवडणुकीत व्यस्त आहेत. या तिघांमधील समन्वयाच्या अभावामुळे महामंडळाची यादी बनण्यास उशीर होत आहे. एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची यादी अंतिम होत असताना दूसरीकडे मात्र काँग्रेसची यादी रखडल्याने महामंडळाच्या नियुक्त्यांना विलंब होत आहे.

दरम्यान, सुरुवातीला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये महामंडळा वाटपावरुन मतभेद समोर आले होते. तिन्ही घटक पक्षांमध्ये महामंडळांचे समसमान वाटप व्हावे, असे काँग्रेसची अपेक्षा होती. मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महामंडळ वाटप आमदारांच्या संख्येनुसार होणार असल्याचे म्हटले होते. मात्र, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही त्यांनी सांगितले होते.

तत्पुर्वी जून महिन्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळीही या दोन नेत्यांमध्ये राज्यातील महामंडळांवरील नियुक्त्यांसंदर्भात चर्चा झाली. या भेटीनंतर महामंडळांवरील नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र या भेटीला चार महिने उलटूनही महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्याच आहेत.

खरंतर, महाराष्ट्रातील महामंडळांची संख्या मोठी महामंडळाच्या अध्यक्षांना कॅबिनेट आणि राज्य मंत्रीपदाचा दर्जा असतो. त्यामुळे मंत्रीपद न मिळालेले आमदार आणि इतर कार्यकर्ते महामंडळ मिळवण्यासाठी चढाओढ करत असतात. मात्र सर्वच आमदरांना महामंडळ देणं शक्य नसते. त्यामुळे अनेकदा आमदारांची नाराजीही ओढवल्याने त्यातून पक्षांतर्गत बंडाळी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकदा महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या जातात. अशातच यावेळीही राज्यात तीन पक्षाचं सरकार आल्यानंतर, काही दिवसातच कोरोनाचं संकट राज्यावर, देशावर ओढावलं. त्यातही आता सरकार स्थापनेला दोन वर्षे झाले तरी महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्याच आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com