वाईनला प्रोत्साहन देणाऱ्यांना अर्थसंकल्प काय कळणार : मुनगंटिवारांचा टोला

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज २०२२०-२३ चा अर्थसंकल्प सादर केला.
Sudhir Mungatiwar
Sudhir Mungatiwar
Published on
Updated on

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज २०२२०-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. मात्र, महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली. मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य-दिव्य स्वप्न दाखवली आहेत. (Union Budget) गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या अर्थसंकल्पाची मांडणी केली गेली असल्याची टीका राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली.

दरम्यान, गेल्या आठवड्यात राज्य सरकारने किराणा सामान मिळणाऱ्या सुपर मार्केटसारख्या ठिकाणी वाईन विकण्याच्या धोरणाला परवानगी दिली. "1000 चौरस फूटच्या जागेत वाईन विकता येईल. शेतकर्‍यांच्या फलउत्पादनाला यामुळे चालना मिळणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजप चांगलीच आक्रमक झाला होता. भाजप नेत्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध करत सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री होऊ देणार नाही, असा इशाराच दिला होता. त्यानंतर आज अर्थ संकल्प जाहीर झाल्यानंतर अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवार यांनी वाईनला प्रोत्साहन देणाऱ्यांना अर्थसंकल्प काय कळणार, असे म्हणत मुनगंटिवारांनी टोला लगावला आहे.

Sudhir Mungatiwar
PMC Election : महापौर मोहोळांच्या वाॅर्डाची तोडफोड.. प्रभागातच अडकविण्याचा प्रयत्न

''मागच्या वर्षीही अर्थसंकल्पा नंतर असेच भाष्य केले. माझ्या देशाचा गौरव कसा होईल यासाठी अर्थसंकल्प आहे. पण वाईनला प्रोत्साहन देणाऱ्यांना हा बजेट कसा कळेल, अशाशब्दांत मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 'मोदींच्या नेतृत्वामध्ये 49 लाख 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 2012-13 च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत या वर्षी तिप्पट अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अनेक देश कोरोनामुळे द्विधा मनस्थितीमध्ये गेले. सर्व देश चिंतेत होते. पण मोदींनी तणावाच्या काळात देखील समतोल दूरदृष्टी असलेला अर्थसंकल्प सादर केला. 'एक समग्र कल्याण हमारा लक्ष है,' असेही यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Sudhir Mungatiwar
Union Budget : मोठे आकडे, गुलाबी स्वप्ने दाखवणारा अर्थहीन संकल्प

इतकी वर्षे काँग्रेसचे सरकार राज्य करत होते. पण पहिल्यादा गरिबांच्या क्षमतेचा विकास करण्याचे बजेट आहे. कोरोना महामारीत देशाचा कोणताही गरीब उपाशी राहता नये यासाठी 638 कोटी वाढवण्यात आले आहेत. शिक्षायुक्त भारत, डिजिटल युक्त भारत, सुरक्षा युक्त भारत असा हा बजेट आहे. या मोदींनी सुक्ष गोष्टीचा विचार केलेला आहे. अमृत मोहोत्सवी वर्षात मोदींनी काही संकल्प केले.

केंद्र सरकारने 100 वर्षाच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला. मागील वर्षभरातील प्रयत्नाला यश आले. 2 कोटी 21 लक्ष डिमॅट खाती सुरू करण्यात आली. भारतात अमेरिका आणि चीन नंतर सर्वात मोठे स्टार्टप सुरू झाले असल्याचे सांगत मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. शिक्षण क्षेत्रातील काही आमूलाग्र बदल या बजेटमध्ये दिसत आहेत. राज्यात देखील कृषी क्षेत्रात चालना मिळू शकते. 80 लक्ष घर बांधण्याचा, निवास योजनेत क्रांती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. राज्य सरकार वाईंनचा जरी निर्णय घेत असले तरी मोदी हर घर शुद्ध जल घेऊन जात आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com