PMC Election : महापौर मोहोळांच्या वाॅर्डाची तोडफोड.. प्रभागातच अडकविण्याचा प्रयत्न

पुणेकर आमच्याच पाठीशी असल्याचा महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचा दावा
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी (PMC Election) प्रारुप प्रभागरचना जाहीर झाली असून सर्वच प्रमुख नेत्यांच्या सोईचे प्रभाग झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी भाजप ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार आहे त्या महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना मात्र घेरण्यात आल्याचे चित्र आहे. ते प्रभागातच अडकतील, अशी व्यवस्था प्रभागरचनेत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. महापौर मोहोळ यांच्या मूळ प्रभागाची पूर्णपणे मोडतोड करण्यात आली आहे. मोडतोडीनंतर महापौर मोहोळ यांचा प्रभाग तब्बल २९ चौरस किलोमीटरचा झाला आहे.

Murlidhar Mohol
PMC Election : धानोरी-विश्रांतवाडीत दोन जागा राखीव, राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी दोनचा प्रभाग

मोहोळ यांचा पौड फाट्यापासून सुरु होणारा प्रभाग थेट भूगाव हद्दीपर्यंत नेण्यात आलेला आहे. प्रभागाचा पसारा दूरवर पसरला असल्याने त्यांना सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. एकीकडे महापालिका निवडणुकीसाठी शहर भाजपसाठी ते प्रमुख चेहरा असताना त्यांचे प्रभागात अडकणे, पक्षाला कितपत परवडणार हाही प्रश्न निर्माण झालेला आहे.

कोथरुड परिसर हा पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला असून कार्यकर्त्यांच्या मोठ्या फळीसह भाजपचे मतदारही या भागात बहुसंख्येने आहेत. या पार्श्वभूमीवर कोथरूडमधील प्रभाग रचना महत्त्वाची मानली जात होती. कोथरूडमध्ये भाजपेतर नगरसेवक निवडून यावेत, यासाठी विरोधकांनी आधीपासूनच कंबर कसली होती. त्यामुळे कोथरूडमधील निवडणूक ही शहरात चर्चेचा विषय ठरलेली आहे.

Murlidhar Mohol
PMC Election : `भाजपसाठी 25 ए प्लस प्रभाग! 100 च्या खाली येणार नाही..`

याबाबत महापौर मोहोळ `सरकारनामा`शी बोलताना म्हणाले, 'प्रभाग रचना कशीही झालेली असली तरी पुणेकर आमच्या पाठीशी आहेत. गेल्या पाच वर्षांत सामान्य पुणेकरांना केंद्रबिंदू ठेवूनच भारतीय जनता पक्षाने महापालिकेचा कारभार केलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदानरुपी साथ मतदार देतील हा विश्वास आहे'.

'माझ्या प्रभागाची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली ही वस्तुस्थिती आहे. प्रभागाची रचना आणि पसारा पाहता, ही रचना नियमांना धरून झालेली नाही, असे माझेही प्राथमिक मत आहे. माझ्या प्रभागाची मोडतोड करुन मला प्रभागातच अडकवून ठेवता येईल. असे विरोधकांना वाटत असले तरी त्यांचा हा भ्रम होता, हे मतदारच मतदान करुन सांगतील, हा माझा विश्वास आहे', असेही महापौर मोहोळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com