Samruddhi Mahamarg Toll Charges: समृद्धी महामार्गावरचे टोलचे दर जाहीर; आकडे वाहनचालकांना फोडणार घाम

Samruddhi Highway Toll Rates News: अवजड वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी सहा हजार १४३ रुपये टोल द्यावा लागणार आहे.
Samruddhi Highway News
Samruddhi Highway NewsSarkarnama
Published on
Updated on

Samruddhi Highway News : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी प्रति किलोमीटर दराने टोलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. टोलसंदर्भात वेगवेगळे अंदाज लावण्यात येत होते. मात्र, राज्य सरकारच्या (State Government) वतीने जाहीर केलेल्या टोलच्या दरानुसार हलक्या वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी ९५१ रुपये टोल द्यावा लागणार आहे. तर अवजड वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी सहा हजार १४३ रुपये टोल द्यावा लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या महार्गाचे रविवारी (ता. ११ ) उद्घाटन झाले. या महामार्गाच्या पहिल्या टप्यात १८ टोल नाके आहेत. राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे सर्व प्रकारच्या वाहनांसाठीचे वेगवेगळे दार जरी करण्यात आले आहेत. पुढील दहा वर्षांसाठीचे दार जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दर तीन वर्षांनी हे दर वाढणार आहेत.

Samruddhi Highway News
Pune closed : उद्या पुणे बंद : साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त !

समृध्दी महामार्गासाठी जाहिर करण्यात आलेल्या टोल दरानुसार चार चाकी आणि हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर दर १ रू. ७३ पैसे पहिल्या तीन वर्षासाठी (संपूर्ण प्रवासासाठी रु. ९५१), दुसऱ्या तीन वर्षासाठी २.०६ रुपये (संपूर्ण प्रवासासाठी रु. ११३३), तिसऱ्या तीन वर्षासाठी २.४५ रुपये (संपूर्ण प्रवासासाठी रु.१३४७) तर शेवटच्या वर्षासाठी २.९२ रुपये (संपूर्ण प्रवासासाठी रु. १६०६ ) असा राहणार आहे.

त्याचबरोबर, हलकी व्यावसायिक, मालवाहतुकीची वाहने अथवा मिनी बस यासाठी प्रती किलोमीटर पहिल्या तीन वर्षासाठी २ रू. ७९ पैसे, दुसऱ्या तीन वर्षासाठी ३ रु. ३२ पैसे, तिसऱ्या तीन वर्षासाठी ३ रु. ९६ पैसे, शेवटच्या वर्षासाठी ४ रु. ७१ पैसे असा दर निश्चित करण्यात आला आहे.

बस अथवा ट्रक यासाठी पहिल्या तीन वर्षासाठी ५ रू. ८५ पैसै प्रति किलोमीटर असा दर निश्चित करण्यात आला आहे. दुसऱ्या तीन वर्षासाठी ६ रु. ९७ पैसे, तिसऱ्या तीन वर्षासाठी ८ रु. ३० पैसे, तर शेवटच्या वर्षासाठी ९ रुपये ८८ पैसे इतका दर निश्चित करण्यात आला आहे. व्यावसायिक वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षासाठी ६ रु.३८ पैसे प्रतिकिलोमीटर आकारण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या तीन वर्षासाठी ७ रु.६० पैसे, तिसऱ्या तीन वर्षासाठी ९ रु.०५ पैसे आणि शेवटच्या वर्षासाठी १० रु. ७८ पैसे इतका टोल दर आकारण्यात येणार आहे.

याशिवाय अवजड बांधकाम यंत्रसामग्री अथवा अनेक आसाची (multi axel) वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षासाठी ९ रु. १८ पैसे प्रति किलोमीटर, पुढील तीन वर्षासाठी १० रुपये ९३ पैसे, त्यापुढील तीन वर्षासाठी १३ रु. ०२ पैसे आणि शेवटच्या वर्षासाठी १५ रुपये ५१ पैसे आकारण्यात येणार आहे. अतिअवजड वाहनांसाठी पहिल्या तीन वर्षासाठी प्रतिकिलोमीटर ११ रु. १७ पैसे आकारण्यात येणार आहेत. तर पुढील तीन वर्षासाठी १३ रुपये ३० पैसे आणि त्यापुढील तीन वर्षासाठी १५ रु. ८४ पैसे, तर शेवटच्या वर्षासाठी १८ रुपये ८७ पैसे आकारण्यात येणार आहे.

Samruddhi Highway News
Tukaram Mundhe News : मुंडेंच्या बदलीसाठी मंत्री सावंतांचीच फिल्डिंग; पत्रच आले समोर!

विशेष म्हणजे एकूण टोल भरताना सध्या देण्यात आलेल्या प्रतिकिलोमीटरचा दर गुणीले प्रवासा दरम्यानचे एकूण टोल नाके यातून जे उत्तर येईल तितका टोल वाहनचालकांना भरावा लागणार आहे. एखाद्या वाहनचालकाला ५ टोलच त्याच्या प्रवासात आले तर त्या प्रतिकिलोमीटरचा दर गुणिले तितके टोल असा गुणाकार करून जितकी रक्कम येईल तितका टोल वाहनचालकास भरावा लागणार लागेल, असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या महामार्गावर वायफळ, सेलडोह वडगाव बक्षी, येळकेली, विरूल, धामणगांव (आसेगांव), गावनेर तळेगांव (शिवनी), कारंजा लाड, शेलू बाजार - वणोझा या ठिकाणी टोल नाके असणार आहेत. तसेच या ठिकाणी फूड प्लाझा आणि अन्य सोयी सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. समृध्दी महामार्गावर बैलगाडी, दोन चाकी, तीन चाकी, सहा आसनी ऑटोरिक्षा, बैलगाडी, ट्रॅक्टर आदी वाहनांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com