Mumbai New Tax Proposal: मुंबईकरांना आता न्यूयॉर्क, सिंगापूरप्रमाणे भरावा लागणार आणखी एक टॅक्स? भाजप नगरसेवकाचा BMC ला प्रस्ताव

Mumbai Traffic Crisis News: मुंबईतील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाने अनोखा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला आहे.
BMC Congestion Tax
BMC Congestion TaxSarkarnama
Published on
Updated on

Makarand Narwekar proposal for congestion tax in Mumbai: काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामानाचा लपंडाव सुरु आहे. हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांचा प्रतिकूल परिणाम शहराच्या हवेच्या गुणवत्तेवर (Air Quality) होत आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्या प्रदूषित हवेचा सामना करावा लागत आहे.

मुंबईतील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाने अनोखा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला आहे. भाजपचे नगरसेवक मकरंद नरवेकर यांनी मुंबई महानगरपालिकेकडे (BMC) हा प्रस्ताव मांडला आहे.

हा प्रस्ताव मंजूर झाला तर मुंबईतील वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल, असा दावा मकरंद नरवेकर यांनी केला आहे. मकरंद नरवेकर यांनी दक्षिण मुंबईतील व्यावसायिक केंद्रांमध्ये 'कंजेश्चन टॅक्स' लागू करा अशी मागणी महापालिकेकडे केली आहे. ज्या गाड्यांमध्ये केवळ एकच व्यक्ती प्रवास करते, अशा वाहनांवर हा कर लावा, असे त्यांनी महापालिकेला सूचवले आहे.

'कंजेश्चन टॅक्स'अशा प्रकारची करप्रणाली लंडन, न्यूयॉर्क आणि सिंगापूर येथे आहे, ही करप्रणाली मुंबईत आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जागतिक स्तरावर लंडन, न्यूयॉर्क आणि सिंगापूर यांसारख्या शहरांनी हा कर यशस्वीपणे राबवून वाहनांच्या संख्येवर नियंत्रण मिळवले आहे.

अशाच प्रकारचा हा कर मुंबई-उपनगरात लावला तर अनावश्यक वाहने रस्त्यावर येणार नाहीत, त्यामुळे प्रदुषणाची पातळी सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास नगरसेवक मकरंद नरवेकर यांना आहे.

BMC Congestion Tax
BMC Mayor election: ठाकरेसेनेची 'मनसे' खदखद बाहेर; भाजपचे 11 पैकी 10 महापौर, त्यांच्या बगलबच्च्यांचे महापौर काय दिवे लावणार?

सध्या मुंबईत पहाटे जाणवणारा बोचरा गारवा आणि दुपारच्या वेळी वाढणारा तापमानाचा पारा, या विषम हवामानामुळे हवेतील प्रदूषके जमिनीच्या पृष्ठभागाजवळ साचून राहत आहेत, परिणामी वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे. रत्यावर कमी वाहने आली तर यात काहीशा फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई आता ३७ व्या क्रमांकावर

जागतिक स्तरावरील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबई आता ३७ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. शहराचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) ३२० इतका नोंदवण्यात आला असून, ही स्थिती पर्यावरण आणि आरोग्य शास्त्राच्या निकषानुसार ‘गंभीर’ (Severe) श्रेणीत मोडते. वाढत्या धुलिकणांमुळे मुंबईच्या क्षितिजावर धुरक्याचे सावट पसरले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com