Mumbai News : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांना शेतकऱ्यांना धमकावल्याच्या प्रकरणात 25 जुलैपर्यंत अटकपूर्व जामीन मिळाला असला, तरी ते सरकारी सेवेत असताना दोनदा निलंबित झाले असल्याची माहिती समोर आली.
लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दिलीप खेडकर दोनदा निलंबित झाले होते.तसेच गेल्या वर्षी खेडकर यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक असताना सक्तीची निवृत्ती घेण्यास सांगण्यात आले असल्याचेही समोर आले आहे.
मुळशी तालुक्यातील दडवली गावातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकवलीच्या प्रकरणात दिलीप खेडकर सहआरोपी आहेत. त्यांची पत्नी मनोरमा यांना पोलिसांनी अटक केली असून तीन दिवस न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस (IAS) अधिकारी पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तुणुकीमुळे चर्चेत आल्या.
त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांशी निगडित असलेल्या वादग्रस्त बाबी समोर येऊ लागल्या. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर देखील सनदी अधिकारी होते.ते आता निवृत्ती झाले असून त्यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला आहे.अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती.
दिलीप खेडकर सरकारी सेवेत असताना लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोनदा निलंबित झाले आहेत. तसेच विभागीय चौकशीला देखील सामोरे गेले आहेत. दिलीप खेडकर यांचे 2018 मध्ये पहिल्यांदा निलंबन झाले होते.त्यांना पुन्हा फेब्रुवारी 2020 मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार महाराष्ट्र जलप्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अंतर्गत निलंबन झाले होते.
मुंबई (Mumbai) येथे प्रादेशिक अधिकारी असताना खेडकर यांच्यावर सुमारे 350 लघुउद्योजकांना त्रास दिल्याचा आणि त्यांच्याकडून बेकायदा पैसे वसूल केल्याचा आरोप आहे. या तक्रारी सन 2015 मध्ये राज्याच्या तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवले होत्या.ही तक्रार अधिकृतपणे मंडळाकडे नोंदवण्यात आली होती.
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेली तळेगावमधील थर्मोव्हेरिटा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अनधिकृत असून तिला नोटीस बजावण्यात आली आहे. या कंपनी व्यवस्थापनाकडे 2 लाख 77 हजार रुपयांची कर थकला आहे.ही कंपनी म.दि.खेडकर यांच्या नावे आहे. महापालिकेने यासंदर्भातील सर्व कागदपत्र तपासली असून कंपनीने शेवटचा कर 2022 मध्ये भरला असल्याचे समोर आले आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.