IAS Pooja Khedkar : वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांना पोलिसांनी का बजाविली दुसरी नोटीस, हे आहे कारण..!

Pooja Khedkar Vs Suhas Diwse : वाशिम जिल्ह्यात बदली झालेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळवणुकीचा आरोप करत त्यांची तक्रार केली होती. वाशिम पोलिसांनी ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी पुणे पोलिसांकडे वर्ग केली आहे.
Pune Police and Pooja Khedkar
Pune Police and Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आपल्या उद्योगांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी आता दुसरी नोटीस दिली आहे. पुणे पोलिसांनी नोटीस बजावून देखील त्या पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात हजर न राहिल्याने त्यांना ही नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अद्यापही वाशीम येथेच मुक्कामी असल्याची माहिती समोर येत आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस (IAS) म्हणून काम करताना पूजा खेडकर यांनी केलेल्या विविध 'पराक्रमां'मुळे त्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. त्यांनी केलेल्या उद्योगाची दखल घेत राज्य सरकारने त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित केला आहे. त्यांना 23 जुलैपूर्वी मसूरी येथे प्रशिक्षण संस्थेत हजर राहण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत.

पुणे जिल्हाधिकारी कार्यलयातून वाशिम जिल्ह्यात त्यांची बदली केल्यानंतर अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे पूजा खेडकर आणि त्यांचे कुटुंब चांगलेच चर्चेत आले आहे. गेल्या वर्षी मुळशी येथील शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकाविल्याप्रकणी त्यांच्या आई-वडिलांसह इतरांवर पौड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक देखील करण्यात आली आहे.

Pune Police and Pooja Khedkar
Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या छळाच्या तक्रारीवर सुहास दिवसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

वाशिम जिल्ह्यात बदली झालेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी (Collector) सुहास दिवसे यांच्यावर छळवणुकीचा आरोप करत त्यांची तक्रार केली होती. वाशिम पोलिसांनी ही तक्रार पुढील कार्यवाहीसाठी पुणे पोलिसांकडे वर्ग केली आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी पूजा यांना जबाब नोंदविण्याासाठी पुणे पोलिस आयुक्तालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र अद्यापही त्या हजर न राहिल्याने पुणे पोलिसांनी त्यांना दुसरी नोटीस देत हजर राहण्यास सांगितले आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित केल्यानंतर देखील त्यांनी आपला मुक्काम वाशिममध्ये कायम ठेवला आहे. दोन दिवस त्यांनी आपला मुक्काम वाढविला आहे. वाशिम विश्रामगृहातील गोदावरी खोलीत त्यांनी आपला मुक्काम ठोकला आहे.74 तास उलटून गेल्यानंतरही त्या तेथेच असल्याची माहिती समोर आली आहे. आपल्याला आवश्यक असलेल्या गरजेच्या सर्व गोष्टी त्या खोलीमध्येच मागून घेत असल्याची माहिती आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुण्यासह 23 तारखेपर्यंत मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात देखील हजर राहवं लागणार आहे. त्यामुळे आपला जबाब नोंदविण्यासाठी पुण्यात कधी येणार हे पहावे लागणार आहे.

Pune Police and Pooja Khedkar
Video Manorama khedkar : मोठी बातमी! IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांना अटक

पूजा खेडकर 20 जुलैला हजर राहणार ?

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी दिवसेंच्या विरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांना 'स्टेटमेंट रेकॉर्ड' करण्यासाठी 20 जुलैला पुणे पोलिस आयुक्तालयात हजर रहावे, असे पुणे पोलिसांनी त्यांना कळविले आहे. पुणे पोलिसांनी त्यांना पहिल्यांदा स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी बोलावल्यानंतर आपल्याला लगेच स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी येणे शक्य होणार नाही असे उत्तर पूजा खेडकरांनी पोलिसांना दिले होते. त्यामुळे आता पोलिसांनी त्यांना दुसरी नोटीस बजावित हजर रहावे असे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com