New Delhi : सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय दिला. मोदी आडनावावरून गुजरात न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावणी होती. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली होती.शुक्रवारी सर्वोच्च न्यायालायने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना खासदारकी बहाल केली आहे. राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिल्यानंतर त्यांना पुन्हा सदस्यत्व मिळणार आहे. या कोर्टाच्या निर्णयाचे सर्वस्तरांतून स्वागत केले जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देतांना काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार सुप्रिया सुळेंनी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा देत दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. न्याय मिळाला आहे. लोकशाहीचा विजय झाला. संविधानाचे समर्थन केले आहे. भाजपने राहूल गांधी यांच्या विरोधात केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला आहे.त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना द्वेषपूर्ण लक्ष्य करणे थांबवण्याची वेळ आली आहे. त्यांनी जनतेने दिलेल्या जनादेशाचा आदर करण्याची आणि देशाचा कारभार सुरू करण्याची वेळ आली आहे, ज्यामध्ये ते गेल्या 10 वर्षांत सपशेल अपयशी ठरले आहेत, असे ट्वीट काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.
सत्यमेव जयते! कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही.राहुल गांधी यांच्याबाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राहुलजी गांधी तुमचे संसदेत स्वागत आहे, असे ट्वीट करीत खासदार सुप्रिया सुळेंनी यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केले आहे. ते म्हणाले की, आजचा निर्णय ही समाधानाची बाब आहे. क्षुल्लक गोष्टीवरुन सदस्यत्व रद्द करणं हा निर्णय लोकशाहीला मारक होता. परंतु कुठेतरी सत्याचा विजय होतोच, ते आज झालं. आता राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल होईल, यात संशय नाही.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.