Jitendra Awhad : रॅप साँग करणाऱ्या दोघांना अटक; जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त करत केली थेट मोठी घोषणा

Jitendra Awhad News : सरकार लोकांची मुस्काटदाबी करत असल्याचा आरोप आव्हाडांनी केला आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama

Thane News : 'चोर आले, पन्नास खोके घेऊन चोर आले’, हे रॅप साँग तयार करणाऱ्या राज मुंगासे या युवकाला अटक झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका रॅप साँग तयार करणाऱ्या युवकाला अटक झाल्याची माहिती समोर आली आहे.

उमेश खाडे असं या अटक केलेल्या युवकाचे नाव असून या याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. 'व्यथा व्यक्त करणं हा गुन्हा असेल, तर कामावर जाणारे आणि ट्रेनमध्ये आपल्या व्यथा मांडणाऱ्या प्रत्येकाला अटक करा, असं म्हणत आव्हाडांनी संताप व्यक्त केला आहे.

Jitendra Awhad
MLA Mother Sells Baskets: किती हा साधेपणा! मुलगा आमदार असतानाही आई विकतेय बांबूच्या टोपल्या

सरकार लोकांची मुस्काटदाबी करत असल्याचा आरोप यावेळी आव्हाडांनी केला आहे. या रॅपरवर झालेल्या कारवाई विरोधात आव्हाड आवाज उठवणार असून या पार्श्वभूमीवर त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. याबबात 'आपण विद्रोह करणार असून मी सगळ्या रॅपर्सना एकत्र करुन ठाण्यात कार्यक्रम घेणार आहे', अशी घोषणाच आव्हाडांनी केली आहे.

काय आहे जितेंद्र आव्हाडांच ट्विट?

''मी सगळ्या रॅपर्सला एकत्र करुन ठाण्यात कार्यक्रम घेणार. आपल्या भाषेत व्यक्त होणे, हे बाबासाहेबांनी दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. विद्रोह हा बुद्धापासून तुकारामापर्यंत सगळ्यांनी केला. शीव, शंभू, फुले, आंबेडकरांनीही विद्रोह केला आणि समाजाला दिशा दिली”, असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com