Maharashtra Political Crisis: राज्यात पुन्हा भूकंप होणार? शिंदे गटाच्या मंत्र्याचं मोठं विधान

Maharashtra Politics| मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करत आहे,
 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Eknath Shinde| Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Uday Samanat On Maharashtra Politics| राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं असताना आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून मोठमोठे दावे केले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत.

महाविकास आघाडीमधील काही आमदार आमच्या संपर्कात अशी येत्या काही दिवसांत महाराष्ट्राला त्याची प्रचिती येईल. ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात आहेत. मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करत आहे, असा दावाही उदय सामंत यांनी केला आहे. याचवेळी त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावरही भाष्य केलं आहे.

 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Asim Sarode on Maharashtra Political Crisis: ...तर धनुष्यबाण आणि शिवसेना पुन्हा ठाकरेंना मिळेल; असीम सरोदेंचे मोठे विधान

सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) राज्यातील सत्तासंघर्ष आणि १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कधीही येऊ शकतो. १७२ आमदार आमच्या पाठिशी आहेत. न्यायालयात आम्ही आमची बाजू योग्य प्रकारे मांडली आहे. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल तो योग्य निर्णय देईल. असा विश्वास उदय सामंत यानी व्यक्त केला आहे.

याचवेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. ज्या शरद पवार साहेबांनी महाविकास आघाडीची मोट बांधली त्यांनीच आज सामना आणि सकाळी सकाळी पत्रकार परिषदा घेणाऱ्यांना काही गोष्टी सांगितल्या. पण आता संजय राऊतच शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागलेत. ते आम्हाला सल्ले देत होते पण संजय राऊतांचा (Sanjay Raut) दुटप्पीपणा महाराष्ट्राने बघितला. असा टोलाही सामंत यांनी लगावला.

 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Vijay Wadettiwar : ‘त्या’ विषयाला आम्ही फुल स्टॉप दिला, आता सरकारला पायऊतार व्हावे लागेल !

सामनामधून शरद पवार आपला राजकीय वारसा निर्माण करण्यास अपयशी ठरले, असं सांगितलं. पण, दुसऱ्या पक्षात डोकावून बघायचंच, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच,यांची दखल घ्यायची आवश्यकता नाही असं आम्ही पूर्वीपासून सांगत होतो. पण आता शरद पवारांनीच सांगितलं की, ते सामना वाचत नाही आणि त्याची दखलही घेत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Edited By- Anuradha Dhawde

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com