Uday Samant : मंत्री उदय सामंत म्हणाले, '46 हजार कोटीवर किती शून्य हेच मला...'

Uday Samant criticizes opponents on Ladki Bahin Yojana : शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी इथं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ केला. योजनेविषयी गैरसमज पसरविणाऱ्या विरोधकांवर टीका केली.
Uday Samant
Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ करताना मंत्री उदय सामंत यांनी या योजनेत महिलांसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद महायुती सरकारने राज्यात केली आहे.

परंतु 46 हजार कोटीवर किती शून्य हेच मला माहिती, असे सांगून या योजनेची भव्यता सांगण्याचा प्रयत्न मंत्री उदय सामंत यांनी केला. " 46 हजार कोटी रुपये देण्याचे धाडस लागतं, आणि ते महायुती सरकारने केले आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही योजना आहे", असे मंत्री उदय सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रारंभ रत्नागिरी इथं करताना शिवसेनेचे (Shiv Sena) नेते मंत्री उदय सावंत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. "या योजनेचा लाभ महाराष्ट्रात सर्वाधिक रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांना मिळाला आहे. या योजनेचा लाभ मिळू नये म्हणून, विरोधकांनी न्यायालयात गेले होते. परंतु न्यायालयाने त्यांना फटकारले. न्यायालयाने योजना थांबवण्यास नकार दिली. आता न्यायालयात कोण केले, याचा तपास महिलांनीच घ्यावा. ज्याने हे पाप केले, आता तेच सत्तेत आल्यावर आम्ही 3 हजार रुपये देण्याचे सांगत आहे", असे म्हणत उदय सामंत यांनी

Uday Samant
Ajit Pawar News : अजित पवारांची लाडक्या बहिणीसाठी आणखी एक मोठी खुशखबर; पुढच्या पाच महिन्यांत...

मतांसाठी योजनेबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांना विरोधकांना उदय सामंत यांनी फटाकारले. मतांसाठी घाणेरडे राजकारण केले जात आहे. हे राजकारण लाडक्या बहिणींपासून लपलेले नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता येणार नाही. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाल आहे. आहे की नाही, असे उदय सामंत यांनी भाषणावेळी समोर बसलेल्या महिलांना केले. मात्र समोरून आवाज कमी आला. त्यावर अरे मोठ्यानं बोला, असे म्हणत उदय सामंत यांनी महिलांना साद घेतली.

Uday Samant
Jitendra Awad On Ramgiri Maharaj : मुख्यमंत्री बसलेत अन् पुढं रामगिरी महाराजांची हिंमत; जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'खेळ परवडणारा...'

महायुती सरकार सुरू केलेल्या कोणत्याही योजना बंद पडणार नाही, अशी ग्वाही उदय सामंत यांनी दिली. विरोधकांपेक्षा आम्ही जिद्दी आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली होती. राखी बांधण्याअगोदर बहिणींच्या खात्यावर पैसे गेले पाहिजे अन् 14 ऑगस्टला पैसे जमा करायला सुरवात केली, असे उदय सामंत यांनी सांगितले.

चंद्र, सूर्य असेपर्यंत योजना थांबणार नाही

या योजनेसाठी महायुती सरकारने 46 हजार कोटी कोटींची तरतूद केली आहे. 46 वर किती शून्य हे आजपर्यंत मला माहीत नाही. एवढं पैसे देण्याचे धाडस लागतं, महायुती सरकारने हे धाडस केले आहे. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही योजना असून, ही योजना अधिक मोठी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. महिलांना विनंती करायची आहे, आपल्या मैत्री, शेजारी, बहिणींपर्यंत ही योजना पोचवा. लेक लाडकी योजना, शुभमंगळ योजना, अन्नपूर्ण योजना सर्व काही महिलांच्या प्रगतींसाठी आहे. योजनासंदर्भात गैरसमज पसवणाऱ्यांना इशारा देत चंद्र आणि सूर्य जोपर्यंत आहेत, तोपर्यंत ही योजना थांबणार नाही, असे भाकीत मंत्री उदय सामंत यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com