Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिवतीर्थवर राडा तर परेलला उद्घाटन; मुंबईत नेमकं चाललंय तरी काय ?

Aditya Thackeray : एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून शांततेचे आवाहन
Crisis On Shivtirth
Crisis On ShivtirthSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Politics : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात मोठा राडा झाला. तर दुसरीकडे परेल येथील उड्डाणपुलाच्या दुसऱ्या लेनचे ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केले. शिवसेनेतील दोन्ही गटात सुरू असलेल्या या वादाने मुंबईतील वातावरण तापले आहे. दरम्यान, दोन्ही गट एकण्याच्या मनस्थितत नसल्याने पोलिस प्रशासनाची मोठी कसरत सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जात अभिवादन केले. यानंतर तेथे ठाकरे गटाचे नेते आहे. त्यावेळी शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा वाद झाला. बाचाबाची आणि शाब्दित चकमकीमुळे स्मृतीस्थळावर मोठा वाद सुरू आहे. (Latest Political News)

Crisis On Shivtirth
Shinde Vs Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे गट - शिंदे गट भिडले; आरोप- प्रत्यारोपांनी वातावरण पेटलं

एकीकडे शिवसेनेचे दोन्ही गट भिडले असताना दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी परेल येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, आधी पुलाचे काम रखडवले होते. आमच्या मागणीनंतर काम पूर्ण झाले. यास आता अनेक दिवस झाले आहेत. आता कुणासाठी या पुलाचे उद्घाटन थांबवले आहे. पालकमंत्र्यांना वेळ नाही म्हणून लोकांची कोंडी करणार का? त्यामुळे लोकांसाठी उद्घाटन केले.

दरम्यान, स्मृतिस्थळावरील राड्याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर आरोप केले. या दोघांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आपापल्या गटातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.

(Edited by Sunil Dhumal)

Crisis On Shivtirth
Jayakwadi Water Issue : पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळवा; विवेक कोल्हेंचा जायकवाडी संघर्षावर पर्याय!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com