Uddhav Thackeray : दानवेंची शिवीगाळ अन् उद्धव ठाकरेंनी मागितली माफी; भाजपनं महिलांचा केलेल्या अपमानाची जंत्रीच मांडली

Uddhav Thackeray Challenge Bjp : भाजपने महिलांचा केलेल्या अपमानाची जंत्रीच उद्धव ठाकरेंनी मांडली. माफी मागण्यासाठी भाजपकडून कोण समोर येणार, असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी दिलं.
uddhav thackeray prasad lad ambadas danve
uddhav thackeray prasad lad ambadas danvesarkarnama

विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्याविषयी केलेल्या विधानाबद्दल शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व माता-भगिनींची माफी मागितली.

पण, ही माफी मागताना उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी भाजपकडून वारंवार माता भगिनींच्या होत असलेल्या अपमानांचे काय? त्यांच्याकडून कोण माफी मागणार, असे म्हणत भाजप नेत्यांनी महिलांविषयी वापरलेल्या अपशब्दांची जंत्रीच उद्धव ठाकरे यांनी मांडली.

शिवसेना नेते विरोधी पक्षनेता अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांच्या पाच दिवसाच्या निलंबनाचा ठराव आज मंजूर करण्यात आला. या कारवाईदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे विधिमंडळात उपस्थित होते. विधिमंडळाच्या कामकाजानंतर त्यांनी झालेल्या प्रकारावरून माध्यमांशी संवाद साधला.

uddhav thackeray prasad lad ambadas danve
Gopichand Padalkar Vs Ambadas Danve : पडळकरांचं दानवेंना चॅलेंज; ‘कोणता शिवसैनिक बोट तोडायला येतो, तेच पाहतो...’

उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या शब्दावरून महाराष्ट्रातील माता-भगिनींची माफी मागितली. ही माफी मागत असताना भाजप नेत्यांनी बहुमताच्या जोरावर एकतर्फी कारवाई केल्याचा निषेध केला. परंतु, भाजप नेत्यांनी महिलांचा वारंवार अपमान केल्याचे प्रसंग मांडून त्यांच्याकडून माफी कोण मागणार, असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

उद्धव ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्रातील माता भगिनींविषयी आम्हाला आदर आहे. आणि तो राहणारच. अंबादास दानवे यांच्यावतीने मी माफी मागतो. परंतु, लोकसभेदरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या आयोजित प्रचार सभेत बहिण-भावाच्या नात्याविषयी अभद्र वक्तव्य केले होते. त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांच्या विषयी भाजपच्या सत्तेत बसलेल्या अब्दुल सत्तार यांनी कॅमेऱ्यासमोर शिवी दिली होती. हा माता भगिनींचा अपमान नाही का?"

"एका महिलेवरती प्रसंग उडवला होता. त्यावेळेस आम्ही मंत्रिमंडळातून संबंधित मंत्र्यांना काढून टाकले होते. त्याला पुन्हा मंत्रिमंडळात घेतले हा महिलांचा अपमान नाही का? असा देखील सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

uddhav thackeray prasad lad ambadas danve
Bachchu Kadu: दानवे-लाड वाद म्हणजे नळावरील बायकांची भांडणं; बच्चू कडू यांनी दानवेंना फटकारलं

"जनतेने सुधीर मुनगंटीवार यांना निलंबित केले आहे. या निवडणुकीत विधानसभेत भाजपला देखील असेच निलंबित करतील," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मार्मिक प्रतिक्रियेने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com