Gopichand Padalkar Vs Ambadas Danve : पडळकरांचं दानवेंना चॅलेंज; ‘कोणता शिवसैनिक बोट तोडायला येतो, तेच पाहतो...’

Mansoon Session : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना सभागृहात वापरलेल्या अपशब्दावरून भाजपचे आमदार आक्रमक झाले आहेत. गोपीचंद पडळकर यांनी दानवे यांच्यासह शिवसैनिकांना आव्हान दिले आहे.
Gopichand Padalkar-Ambadas Danve
Gopichand Padalkar-Ambadas DanveSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 02 July : शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांचे बोट तोडण्याच्या भाषेला आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हान दिलं. ‘सभागृहात आम्ही भाजपच्या सर्व आमदारांनी त्यांच्याकडे बोट केलं होतं. कोणत्याही शिवसैनिकाला आमच्याकडे पाठवून द्या. आमचे बोट तोडायला. अरे ते आमच्या केसालासुद्धा धक्का लावू शकणार नाहीत", अशा शब्दांत पडळकर यांनी दानवे यांना डिवचले आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve ) यांनी भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलेल्या हातवाऱ्यांवर वापरलेल्या अपशब्दाने सकाळपासूनच राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. भाजप आमदार (BJP MLA) चांगलेच आक्रमक झाले आहेत. प्रत्येक आमदार आपल्या स्टाईलमध्ये अंबादास दानवे यांना आव्हान देत आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनीही आव्हान दिले आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, आम्ही सर्व भाजप आमदारांनी त्यांना सभागृहामध्ये बोट दाखवले आहे. कोणता शिवसैनिक पाठवून द्यायचे, आमचे बोट तोडायला, पाठवून द्या. अरे, हे आमच्या केसालासुद्धा धक्का लावू शकणार नाहीत. अंबादास दानवे यांनी सभागृहात चुकीची भाषा वापरलेली आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागितलीच पाहिजे. त्याशिवाय सभागृहाचे कामकाज पुढे सुरू होणार नाही. आमच्या आयाबायांचा अपमान आम्ही सहन करणार नाही.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अंबादास दानवे यांच्या सभागृहातील अपशब्दांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना देखील फटकारले. त्यांना आया-बहिणींवर अपशब्द वापरल्यास चालते. संजय राऊत हा बाडगा माणूस आहे. त्याच्याविषयी आपण काय बोलणार, अशा शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना फटकारले.

Edited By : Vijay Dudhale

Gopichand Padalkar-Ambadas Danve
Vidhan Parishad Election : पुन्हा फोडाफोडी होणार; विधान परिषद निवडणुकीत महाआघाडी तिसरा उमेदवार देणार?, बड्या नेत्याचे विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com