Uddhav Thackeray, Praful Patel
Uddhav Thackeray, Praful PatelSarkarnama

Uddhav Thackeray : पटेलांनी PM मोदींना जिरेटोप दिला; उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला, नेमके काय म्हणाले?

Palghar Lok Sabha Election : भाजपने विरोधातील बड्या नेत्यांना पक्षांतर करायला भाग पाडले. आमच्याकडे या अन्यथा, जेलमध्ये जा, अशी त्यांची नीती आहे.

Palghar Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी भाजपची सत्ता असलेल्या 12 राज्याचे मुख्यमंत्री आणि 18 कॅबिनेट मंत्री यांच्यासह मित्रपक्षांचे नेतेमंडळीही उपस्थित होती.

यावेळी अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल यांनी मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असलेला जिरे टोप भेट म्हणून दिला. यावरून राज्यात वातावरण पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रफुल पटलेंना Praful Patel खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटल्याची चर्चा आहे.

पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी मविआची वसईत सभा झाली. यावेळी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी प्रफुल पटेलासह भाजपचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. त्यांनी प्रफुल्ल पटेलांनी नरेंद्र मोदींना जिरेटोप घातल्याच्या कृतीचा जाहीर निषेध केला. ते म्हणाले, पंतप्रधान मोदींचा Narendra modi अर्ज भरायला प्रफुल पटेल गेले होते. पटेल आता तुम्ही लाचार झाला आहात. मोदींच्या चरणी लीन झाला आहे. तेथे लीन होताना महाराजाची टोपी ठेवता, असे खडेबोल ठाकरेंनी पटेलांना सुनावले आहेत.

Uddhav Thackeray, Praful Patel
Dheeraj Wadhawan Arrest : DHFL मध्ये तब्बल 34000 कोटींचा घोटाळा; धीरज वाधवनला CBIकडून अटक, काय आहे प्रकरण?

भाजपच्या विरोधकांबाबतच्या नीतीवर बोलताना ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, आता लोकसभा निवडणुकीचा ⁠शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. भाजपने विरोधातील बड्या नेत्यांना पक्षांतर करायला भाग पाडले. आमच्याकडे या अन्यथा, जेलमध्ये जा… अशी त्यांची नीती आहे. यामुळे ⁠कधी नव्हे तेवढा महाराष्ट्रात उद्रेक झाला आहे. आता ⁠कोणत्याही परिस्थितीत देशात इंडिया आघाडीचे सरकार आणणारच, असा निर्धारही ठाकरेंनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, अमित शाह Amit Shah यांनी उद्धव ठाकरेंवर राम मंदिरावरून जोरदार टीका केली होती. त्याचाही ठाकरेंनी हिशेब चुकता केला. ते म्हणाले, भाजपचे अमित शाह येथे आले होते. त्यांनी मला राम मंदिरावरून काही प्रश्न विचारले आहेत. आता अमित शाह मी तुमच्यासोबत येतो. ⁠मला म्हणाले उद्धव ठाकरे राम मंदिरात गेले नाही. आता मी काय मुहुर्त काढून त्याठिकाणी जायला त्यांचा अंधभक्त नाही. मुख्यमंत्री असतानाच आयोध्येला जावून आलो आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray, Praful Patel
Tihar Jail News: ऐन निवडणुकीच्या काळात तिहार तुरुंग रडारवर? बॉम्ब हल्ल्याच्या धमकीमुळे प्रशासनाची धावपळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com