ही तर शिवसेनेला गिळायला निघालेली औलाद ; बंडखोरावर ठाकरे संतापले...

Uddhav Thackeray Interviews| Sanjay Raut| ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला.
Uddhav Thackeray Interviews| Sanjay Raut|
Uddhav Thackeray Interviews| Sanjay Raut|
Published on
Updated on

चुक माझी आहे, गुन्हा माझा आहे. मी यांना कुटूंबातले समजून यांच्यावर अंधविश्वास ठेवला. पण यांना आता मुख्यमंत्रीपद पण पाहिजे आणि पक्षप्रमुख पदही पाहिजे. ही राक्षसी महत्त्वकांक्षा आहे. राजकारणात यांना ज्यांनी जन्म दिला तिला म्हणजे शिवसेनेला गिळायला निघालेली औलाद आहे. पण शिवसेनेला कुणीही गिळू शकत नाही, अशा शब्दातं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर पुन्हा टीकेचा आसूड ओढला. दैनिक सामना'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील सत्तासंघर्षाच्या घडामोडींवर भाष्य केलं. शिवसेना, भाजप आणि बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही एकदा विश्वास ठेवला तर ठेवला. त्याला ताकद देण्याचं, शक्ती देण्याचं काम आम्ही करतो, पण आज आम्ही हिंदूत्व सोडल्याची बोंब मारतायेत, त्यांना मला एक विचारायचं आहे. २०१४ मध्ये जेव्हा भाजपने शिवसेनेशी युती तोडली तेव्हा आम्ही काय सोडलं होतं? आजही आम्ही हिंदूत्व सोडलेलं नाही. २०१४ मध्ये शिवसेनेला विरोधीपक्षात बसायची वेळ आली होती. तेव्हाही अनेकांना वाटलं होतं की आता शिवसेना संपेल पण तेव्हा शिवसेना एकाकी लढली आणि आमचे ६३ आमदार निवडून आले. विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली होती तेव्हाही मी ते पद कोणाला दिलं होतं. पण भाजपने जे आता केलं ते अडीच वर्षांपूर्वीच केलं असतं तर ते सन्मानाने झालं असतं. देशभरात पर्यटन करण्याची वेळ आली नसती, असा टोला बंडखोर आमदारांना लगावला.

Uddhav Thackeray Interviews| Sanjay Raut|
त्याकाळात यांच्या हालचाली जोरात होत्या; ठाकरेंनी सांगितला थरारक अनुभव

पण हे सर्व करण्यामागे त्यांना शिवसेना संपवायची आहे. आता त्यांनी जी तोडफोड केली आहे, ती करुनही त्यांचं समाधान होत नाही म्हणून त्यांना शिवसेना संपवायची आहे. कारण त्यांना हिंदूत्त्वात भागीदार नको आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्त्व मजबूत होण्यासाठी, हिंदूत्त्वासाठी राजकारण केलं. पण ते राजकारण करण्यासाठी हिंदूत्त्व वापरत आहेत. हा त्यांच्या आणि आमच्या हिंदूत्त्वातला फरक आहे.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ठरलं होतं, तेव्हाच जर हे केलं असतं तर सन्मानानं झालं असतं. पण भाजपला ठाकरे-शिवसेना वेगळी करायची आहे. भाजपचा शिवसेना संपवण्याचा कट आहे, असा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. शिवसेना तळपती तलवार आहे. संघर्षासाठी शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना आणि संघर्ष पाचवीला पुजलेला आहे. पण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केला. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. विश्वास ठेवला त्यांनीच घात केला, पण आता तुम्हाला विश्वासघाताचा शिक्का पुसता येणार नाही. अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com