गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना फटकारल्याचे ठाकरेंकडून कौतुक; म्हणाले,तो कोण होता...

Uddhav Thackeray : उद्या कोणताही मुख्यमंत्री कसाही वागला तर त्यांची कानउघडणी केलीच पाहिजे ...
Uddhav Thackeray, Gulabrao Patil Latest News
Uddhav Thackeray, Gulabrao Patil Latest Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिक्षणमंत्री (Education Minister) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिलेल्या उत्तरावरून समाधान न झाल्याने विधान परिषदेत विरोधकांनी सभागृहात जोरदार विरोध केला होता. यावेळी मध्येच टेबलावर हात मारून निवेदन करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची सभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी चांगलीच कानउघडणी केली होती.

नेमका याच गोष्टीचा संदर्भ देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नीलमताई काल परवा तुम्ही सभागृहाची उंची राखली. तुम्ही मंत्र्यांला खडसावून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद, तुम्ही या सभागृहाचं पावित्र्य कसं राखलं पाहिजे हे दाखवून दिलं,अशा शब्दात त्यांनी डॅा. गोऱ्हेंचे कौतुक केले. (Uddhav Thackeray, Gulabrao Patil Latest News)

Uddhav Thackeray, Gulabrao Patil Latest News
आमदार शेळकेंना एसपींचा फोन आला म्हणून आज पुणे-मुंबई हायवे ठप्प झाला नाही; अन्यथा...

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'मातोश्री' येथे आज (ता.२१ ऑगस्ट) करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai),आमदार रविन्द्र वायकर, शिवसेना (Shivsena) सचिव मिलिंद नार्वेकर, रवी म्हात्रे, उपसभापती कार्यालयाचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर, विशेष कार्यकारी अधिकारी सुप्रिया घोटाळे, पुणे शहरसंघटक राजेंद्र शिंदे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, अश्विनी शिंदे, कौस्तुभ खांडेकर यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ठाकरे बोलत होते.

Uddhav Thackeray, Gulabrao Patil Latest News
मित्राच्या मदतीला धावून आले रोहित पवार ; म्हणाले, आदित्य ठाकरेंना सहानुभूती मिळेल..

ठाकरे म्हणाले, नीलमताई काल परवा तुम्ही सभागृहाची उंची राखली. तुम्ही मंत्र्यांना खडसावून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद, तो कोण होता म्हणून नाही तर आपण जिथे बसलो, ज्या पदावर बसलो. त्याला न्याय देताना आपण कुठे आलो आहोत याचं भान राहीला पाहिजे. या सभागृहाचं पावित्र्य कसं राखलं पाहिजे हे तुम्ही दाखवून दिलं. उद्या कोणताही मुख्यमंत्री कसाही वागला तर त्यांची कानउघडणी केलीच पाहिजे आणि ते तुम्हाला करावे लागणार,अशा शब्दात सभागृहातील बेशिस्तीवर यांच्यावर सडकून टीका केली.

पुढे ते म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात. आपल्या महाराष्ट्रात अशा घटना घडता कामा नये. महिला अत्याचारात कोणतीही जातपात पाहू नये. स्त्री म्हणूनच या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे. त्यांना न्याय दिला पाहिजे. मग बिल्किस बानो असो की भंडाऱ्याचं प्रकरण असो किंवा निर्भया प्रकरण असो. सर्व पक्षांनी एकत्र येऊन महिला अत्याचारावर आपल्या कार्यकर्त्याला दयामाया दाखवू नये. तुमचं सरकार म्हणून आम्ही ओरडतो. आमचं सरकार म्हणून तुम्ही ओरडणार,असा कोडगेपणा असू नये. सर्वांनी एकत्र येऊन महिला अत्याचारावर काम केलं पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर मांडली.

Uddhav Thackeray, Gulabrao Patil Latest News
‘शिंदे-फडणवीसांचं सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; शहाजी पाटील हे त्यातील सोंगाड्या’

गोऱ्हे यांच्या कार्याबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले की, राज्यातील अनेक भागात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना घडल्यावर, तिथे जाऊन कुटुंबियांशी चर्चा करून त्यांना आधार देण्याच काम नीलम ताईंनी आजपर्यंत केले आहे. मी त्यांना सांगण्या अगोदर, साहेब मी घटनेच्या ठिकाणी आहे. हे आजवर मी अनेकदा पाहिले असून एखाद्या महिलेमध्ये क्वचित, अशी वृत्ती पाहण्यास मिळते. अशा शब्दात त्यांनी आजवरच्या त्यांच्या कार्याचं ठाकरे यांनी कौतुक केले.

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आजवर मला ज्या जबाबदार्‍या दिल्या. त्या प्रत्येक पदाला न्याय देण्याचे काम केले आहे. महिला कार्यकर्ता ते विधान परिषद उपसभापती पदापर्यंतचा प्रवास इतका सोपा नव्हता. त्या दरम्यान बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि तमाम शिवसैनिक यांनी साथ दिल्याने इथवर पोहोचू शकले आहे.

यामुळे अनेक भूमिका पार पाडता आल्या आणि आज विधान परिषदेच्या कामकाजा बद्दल कार्य अहवालाचे प्रकाशन उद्धवजी यांच्या हस्ते होत आहे.याबद्दल मला आनंद आहे.तसेच आता यापुढील काळात देखील समाज प्रबोधन व वैधानिक काम वाढविण्यावर भर देणार असल्याची ग्वाही गोऱ्हे यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com