Uddhav Thackeray Dharavi Morcha : समझने वालों को इशारा काफी है; ठाकरेंनी अदानींवरून PM मोदी, शाहांवर डागली तोफ

Dharavi Bachao Andolan Uddhav Thackeray Speech : धारावीतील मोर्चातून उद्धव ठाकरे यांनी नाव न घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर हल्लाबोल केला...
Pm Modi, Uddhav Thackeray
Pm Modi, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai Politics News : धारावी बचाव मोर्चातून ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना इशारा दिला आहे. समजनेवालों को इशारा काफी है, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली आहे.

समजने वालों को इशारा काफी है. हा इशारा मोर्चा आहे. दूरदूरपर्यंत मोर्चा पसरला आहे. शेवटचं टोकही दिसत नाहीये. मोर्चाचा हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. हा आवाज अहमदाबादपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हा आवाज जे चेले, दलाल, सुपारीबाज आहेत यांच्या कानापर्यंत गेला पाहिजे. त्यांच्या कानापर्यंत हा आवाज पोहोचत नसेल तर हा आवाज त्यांच्या कानाखाली उठल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांना कळले पाहिजे, असा इशार उद्धव ठाकरे यांनी या मोर्चातून दिला.

Pm Modi, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : " बंडखोरांना 50 खोके कुणी दिले ते आज कळले!"; ठाकरेंनी भरसभेत नावच जाहीर करुन टाकले

हा प्रश्न केवळ धारावीचा नाहीये. हा मुंबई खतम करण्याचा डाव आहे. आजपर्यंत जो काही विकास होतोय तो मुंबई महापालिकेद्वारे होतोय. कोस्टल रोडही महापालिकेच्या पैशांच्या जोरावर होतोय. या कोस्टल रोडवर आपण टोल लावणार नव्हतो. आता हे टोल लावणार आहेत. ही टोलधाड आहे. तेव्हा जे काही झालं त्यावेळी भाजपा नव्हती. खरेदी विक्री करायला भाजपा येते. मुंबईसाठी जो लढा झाला. मुंबई पेटली होती, महाराष्ट्र पेटला होता. आणि मग मुंबई मिळाली. आज त्यांनी मुंबईचा विकास हा दिल्लीवरून निती आयोगाच्या माध्यमातून करायचं ठरवलं आहे. हे कशासाठी? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज या लढ्याची सांगता नाही तर, सुरुवात झालेली आहे, एवढं लक्षात ठेवा. आमच्या प्रमुख मागण्या पूर्ण करा. घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसाला धक्काही लागता कामा नये. तिथल्या तिथे घर द्या. पात्र-अपात्र आम्ही मानत नाही. व्यावसायालाही जागा दिली पाहिजे. कोळीवाडा, कुंभारवाडा यांच्यासह व्यावसायाला आवश्यक असलेली जागा दिलीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यांनी पोलिसांचं विशेष पथक ठेवलं आहे. पण सरकार येतं आणि जातं पोलिसांनी आपलं रेकॉर्ड खराब करू नये. नोंद तुमच्याकडेही होते आणि जनतेकडेही होते. आणि काही निवृत्त पोलिस आणि त्यांचे गुंड इकडे सोडलेले आहेत. पण ही गुंडागर्दी झाली तर ती तिथल्या तिथे ठेचून टाका. मी तुमच्यासोबत आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी थेट राज्य आणि केंद्र सरकारला आव्हान दिले आहे.

Pm Modi, Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sabha : 'अदानींकडे धारावी हा जगातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा!'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com