Mumbai News : शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावून ठाकरे सरकार पाडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या साथीला गेलेल्या ४० आमदारांवर ५० खोके (५० कोटी) घेतल्याचा आरोप राज्यभर गाजला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून आदित्य,अगदी जुन्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवारांनी शिंदे आणि ४० आमदारांना ५० खोक्यांवरून हिणवले.त्यावरून शिंदेंचे आमदार भलतेच आकक्रम होऊन जशास तसे उत्तर देत राहिले.पण ५० खोक्यांनी शिंदेंची पाठ सोडली नाही.
गेल्या काही दिवसांत हा मुद्दा थोडा मागे पडला असतानाच धारावी वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ५० खोक्यांवरून शिंदेंना झोडपले.धारावी वाचविण्याच्या उद्देशाने काढलेल्या आंदोलनात भाषण ठोकताना बंडखोरांना ५० खोके कोणी दिले, हे आता कळल्याचे सांगून ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे अदानींना जोडले. ठाकरेंच्या या नव्या शोधामुळे आता वादाला तोंड फुटणार असल्याचेही संकेत आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेने( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी धारावीकरांसाठी उद्योगपती गौतम अदानींविरोधात (Gautam Adani) मोर्चा काढला. या मोर्चावेळी बोलताना त्यांनी अदानी, शिंदे गट आणि भाजपवर टीकेची तोफ डागली. ठाकरे म्हणाले,सर्वकाही अदानींच्या घशात घालू देणार नाही. सरकार बनवण्यासाठी खोके कोणी पुरवले असतील हे आता लक्षात आलं असेल असा आरोपही त्यांनी केला.
ठाकरे म्हणाले, बंडखोरांना विमानं कोणी पुरवली असतील, हॉटेल कोणी बुकिंग केलं असेल. सरकार पाडण्याचं खरं कारण तुम्हाला कळलं असेल.पण माझ्यासोबत सर्व पक्ष एकवटले आहेत.जेव्हा जेव्हा मुंबईवर संकट येतं तेव्हा पहिल्यांदा शिवसैनिक धावतो असे ठाकरे यावेळी म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उद्धव ठाकरेंनी मुंबईत धारावीकरांसाठी काढलेल्या मोर्चावेळी उद्योगपती गौतम अदानींवर सडकून टीका केली.ते म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून हा प्रकल्प नुसता चर्चेत आहेत.आता सध्या फक्त आपले पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरवले आहेत.पण गरज पडली तर संपूर्ण महाराष्ट्र धारावीत उतरवेन असा इशाराही ठाकरेंनी सरकारला दिला.(Dharavi Shivsena Morcha)
आज फक्त मुंबई उतरली आहे. ज्यांनी अदानी यांची सुपारी घेतली त्यांनी हा अडकित्ता लक्षात आहे. चेचून चेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा अदानीचे नाव घेणार नाही. ५० खोके कमी पडले म्हणून या बोक्याची नजर आता धारावीकडे वळली आहे.सरकार आपल्या घरी नाही तर सरकार अदानीच्या दारी असल्याची खोचक टीकाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.