Shivsena : उद्वव ठाकरेचं शिवसेना आमदारांना भावनिक पत्र..

कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले.
Uddhav Thackeray News, Maharashtra Political Crisis
Uddhav Thackeray News, Maharashtra Political CrisisSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेना ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांच्या एकमेकांवरील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. निकालाचा निर्णय येण्यापूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या सोबत राहिलेल्या १५ निष्ठावान शिवसेना आमदारांना भावनिक पत्र लिहिले आहे. (Uddhav Thackeray news update)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (Eknath Shinde) 16 बंडखोर आमदारांची आमदारकीचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. या सुनावणीवर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. शिवसेनेतून बंड करणाऱ्या, 16 आमदारांना अपात्र करा असं पत्र शिवसेनेच्या वतीनं विधानसभा उपाध्यक्षांना देण्यात आलं होतं.(Shivsena Latest Marathi News)

त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांना नोटीस बजावत 48 तासात नोटीसीचे उत्तर देण्यास सांगितले होते. पण या नोटिशीला उत्तर न देता या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आज संबंधीत याचिकेवर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या येणाऱ्या या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.

Uddhav Thackeray News, Maharashtra Political Crisis
Goa Congress Crisis : कॉंग्रेसमधील बंडखोरी रोखण्यासाठी बडा नेता गोव्यात

आपल्या पत्रात उद्धव ठाकरे म्हणतात..

शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com