Sharad Pawar: मुंबईतील 7 जागांसाठी शरद पवार गट आग्रही; वरिष्ठ नेत्यांमध्ये बोलणी सुरु

Maharashtra Assembly Election 2024 NCP Sharad Pawar Party Mumbai:ठाकरे गट आणि काँग्रेसचा अनेक जागांवर दावा असून शरद पवार गटाचा देखील काही जागासाठी आग्रही आहे. जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुंबई शहरातील 36 जागांपैकी 7 जागांवर दावा ठोकला आहे. लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघ आपला असताना महाविकास आघाडीत शरद पवार गटाने हा मतदारसंघ शिवसेनेला (ठाकरे गट) दिला. आता विधानसभेसाठी मुंबई शहरात शरद पवार गट 7 जागांवर ठाम आहे. अणुशक्ती नगर, कुर्ला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, दहिसर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम या त्या जागा आहेत,

मुंबईतील जागांसाठीचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. याबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरु आहे. तीनही पक्षांनी एकमेकांच्या काही विद्यमान जागांवर दावा ठोकला आहे.

ठाकरे गट आणि काँग्रेसचा अनेक जागांवर दावा असून शरद पवार गटाचा देखील काही जागासाठी आग्रही आहे. जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

मुंबईतील 20 जागांवर शिवसेना ठाकरे गट तर काँग्रेस 18 जागांवर ठाम आहे. काँग्रेसच्या कोट्यातील धारावीसाठी ठाकरे गट आग्रही आहे. ठाकरे गटाच्या कोट्यातील भायखळाच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. त्यामुळे जागांची आदलाबदल होऊ शकते, याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये बोलणी सुरु आहे.

Sharad Pawar
Eknath Shinde: अजितदादांच्या नेत्याची एकनाथ शिंदेंसोबत जवळीक वाढली; पुन्हा घरवापसी?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाईम्स नाऊ नवभारत मॅट्रीजकडून सर्वेक्षण केले आहे, त्यानुसार विधानसभेच्या रणधुमाळीत महायुती आणि आघाडीमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचे दिसते. विधानसभा निवडणुकीत 145 हा बहुमताचा आकडा आहे. महायुतीला 137 ते 152 जागा, महाविकास आघाडीला 129 ते 144 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती बहुमताचा आकडा गाठू शकते. पण तो आकडा गाठणं महायुतीलादेखील सोपं नाही, असे दिसते.

विधानसभा निवडणुकीचे पडघड लवकरच वाजणार

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग आज (13 सप्टेंबर) जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणुकीचा आढावा घेणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. बैठकीमुळे विधानसभा निवडणुकीचे पडघड केव्हाही वाजू शकतील, अशी शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयाद्या अपडेट करण्याचे काम सुरू झाले होते. तेही आता पूर्ण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com